Kolhapur : लाखो गुंतवणुकदारांना तीन हजार कोटींना गंडविणारा जेरबंद; कसा घातला गंडा? वाचा…

Kolhapur : लाखो गुंतवणुकदारांना तीन हजार कोटींना गंडविणारा जेरबंद; कसा घातला गंडा? वाचा…

Kolhapur : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एएस ट्रेडर्स अ‍ॅंड डेव्हलपर्स या कंपनीने गुंतवलेल्या रकमेवर दाम दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासह अन्य राज्यातील लाखो गुंतवणुकदारांना सुमारे 3 हजार कोटींना या कंपनीने गंडा (Fraud) घातला आहे. असा आरोप या कंपनीवर आहे. या कंपनीचा मालक लोहितसिंग सुभेदार अखेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आज मंगळवारी कोल्हापूर पोलिसांनी (Police) त्याला ताब्यात घेतलं आहे.

Shinde Vs Thackeray : शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचं? ‘सुप्रीम’ सुनावणीची तारीख ठरली…

कसा घातला गंडा?

लोहितसिंग सुभेदार याने एएस ट्रेडर्स अ‍ॅंड डेव्हलपर्स ही कंपनी स्थापन केली होती. त्यात त्याने लाखो गुंतवणुकदारांना गुंतवलेल्या रकमेवर दाम दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्या अमिषाला अनेक गुंतवणुकदार बळी पडले त्यातून त्याने राज्यातील लाखो गुंतवणुकदारांना सुमारे 3 हजार कोटींना या कंपनीने गंडा (Fraud) घातला आहे. या कंपनीने महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि अन्य राज्यातील गुंतवणुक दारांना देखील फसवले आहे. या कंपनीची शाखा कोल्हापूरमध्येही आहे.

Women Reservation Bill : ही तर सर्व महिलांची फसवणूक; काँग्रेस नेत्या भाजपवर भडकल्या!

या कंपनीने केलेल्या फसवणुकीबद्दल समोर आलेल्या प्राथमिक महितीनुसार त्याने राज्यातील लाखो गुंतवणुकदारांना सुमारे 3 हजार कोटींना या कंपनीने गंडा (Fraud) घातला आहे. या प्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुभेदारसह 29 संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. गेल्या महिन्यात सुभेदारच्या विश्वासू सहकारी व फरारी संचालक अमित शिंदे याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर आता या कंपनीचा मालक लोहितसिंग सुभेदार अखेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या घोटाळ्यामध्ये आणखी महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube