Shinde Vs Thackeray : शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचं? ‘सुप्रीम’ सुनावणीची तारीख ठरली…

Shinde Vs Thackeray : शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचं? ‘सुप्रीम’ सुनावणीची तारीख ठरली…

Shinde Vs Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटासंदर्भातील अनेक प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून(Thackeray Group) सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिलं आहे. यावर आता सुनावणीची तारीख ठरलीयं. येत्या 10 ऑक्टोबरला या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे.

Women’s Reservation Bill लागू झाल्यावर महाराष्ट्रात 16 महिला खासदार तर विधानसभेत किती महिला असणार?

सर्वोच्च न्यायालयात काल अपात्र आमदार प्रकरण आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत दोन्ही प्रकरणावर सुनावणी पार पडली. यामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी 3 आठवड्यांसाठी लांबणीवर तर दुसरी 16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावर दाखल याचिकेवर 2 आठवड्यानंतर सुनावणी पार पडणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता.

साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता काढून घेण्याचा घाट, सदानंद मोरे यांचा आरोप

मात्र, आता दोन्ही प्रकरणांमधील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या उद्धव ठाकरे गटाने(Udhav Thackeray Group) दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 10 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे. मागील वर्षी राज्यात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारासंह शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी भाजपशी हातमिळवणी करीत सत्तास्थापन केली आणि स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

भीषण अपघात! कार आणि कंटेनरच्या धडकेत भाजपच्या नगरसेवकचा मृत्यू, राजकीय वर्तृळात शोककळा

एवढंच नाहीतर शिंदे यांनी शिवसेना हा आपलाच पक्ष असल्याचा दावा केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदेंच्याच शिवसेनेच्या बाजूने निकाल देत धनुष्यबाण बहाल केलं. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निकालाला सर्वोच्च न्यायालयाच चॅलेंज केलं होतं.

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंवर मध्यरात्री हल्ला, एकटं गाठून गाडी अडवली अन्…

दरम्यान, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडूनही शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान केलं आहे. आता या प्रकरणावर येत्या 10 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार असून सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता विधी मंडळात सुनावणी पार पडत आहे, उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या पुर्नविलोकन याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीमध्ये शिवसेना पक्ष चिन्ह आणि 16 अपात्र आमदारांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube