राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा नगरवर डोळा; विधानसभेच्या लढाईत कोण मारणार बाजी?

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा नगरवर डोळा; विधानसभेच्या लढाईत कोण मारणार बाजी?

Ahmednagar News : साखर कारखाने आणि सहकाराभोवती फिरणाऱ्या नगर जिल्ह्यात (Ahmednagar News) सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे जिल्ह्यात शरद पवार (Sharad Pawar) गटाची ताकद कमी झाली. पुढे लोकसभेच्या निवडणुकीत मात्र नगर दक्षिणेत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणत जिल्ह्यात शरद पवार यांचं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध झालं. यानंतरच्या घडामोडीतही नगर जिल्हा चर्चेत राहिल याची काळजी शरद पवारांनी घेतली. पक्षाच्या वर्धापनदिनाचा सोहळा नगरमध्येच घेतला. शरद पवारांच्या या राजकारणाची कुणकुण लागताच अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनीही (Sunil Tatkare) आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नगरमधूनच केली. नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व काय आहे याची जाणीव असल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी नगर जिल्ह्यावर फोकस केल्याचं दिसत आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमातून नगर दक्षिण लोकसभेची पेरणी..

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा नगर जिल्ह्याने अजित पवारांना साथ दिली. मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सहापैकी चार आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार गटाकडे फक्त दोनच आमदार राहिले. यापुढे शरद पवार गटातील नाराजांना आपल्या पक्षात घेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्याचाडी डाव अजितदादांनी टाकला. या काळात नगर दक्षिणेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना

नगर विधानसभेसाठी ठाकरे गट सक्रिय; जागा शिवसेनेला मिळवण्यासाठी माजी आमदाराच्या मुलाचं पत्र

नगर जिल्ह्याची राजकीय नस, सहकाराचं जाळं, त्यातून पुढे आलेलं नेतृत्व, कार्यकर्त्यांची पुरेशी जाण आहे. त्यातूनच जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करण्यास दोन्ही नेत्यांनी सुरुवात केली. याची पहिली झलक लोकसभा निवडणुकीत दिसली. महायुतीने सुजय विखे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात शरद पवारांकडे सुरुवातीला उमेदवार नव्हता. नंतर मात्र आमदार नीलेश लंके यांना आपल्याकडे खेचून घेण्यात त्यांना यश आले. इतकेच काय तर त्यांना निवडूनही आणलं. मतदारसंघात पक्षाची ताकद कमी असतानाही त्यांनी हा चमत्कार करून दाखवला.

निवडणुकीतील यशानंतरही शरद पवार शांत बसले नाहीत. काहीच दिवसात पक्षाच वर्धापनदिनासाठी याच नगर जिल्ह्याची निवड केली. अर्थात यामागे त्यांचा वेगळा विचारही होताच. मेळाव्यात स्वतः उपस्थित राहून त्यांनी आगामी विधानसभेचंही राजकारण सेट केलं. शरद पवारांच्या या राजकीय डावपेचांना उत्तर देण्यासाठी अजित पवार गटानेही हालचाली केल्या. शरद पवार गटाचा मेळावा झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनीही विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात नगरमधूनच केली.

मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना ज्या विधानसभा मतदारसंघात यश मिळालं होतं त्या मतदारसंघांचा आढावा घेतला. येथील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत चाचपणी केली. महायुतीच्या जागावाटपात त्या जागा राष्ट्रवादीकडेच राहतील याची काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले होते. शरद पवार यांच्यापाठोपाठ दौरा घेतला हा योगायोग आहे. पण राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज