नाशकात ट्विस्ट! शांतीगिरींनंतर अनिकेत शास्त्रींची एन्ट्री; शिंदेंच्या खासदाराची वाढली धाकधूक

नाशकात ट्विस्ट! शांतीगिरींनंतर अनिकेत शास्त्रींची एन्ट्री; शिंदेंच्या खासदाराची वाढली धाकधूक

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून सुटलेला  (Nashik Lok Sabha) नाही. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांची धाकधूक कायम आहे. राष्ट्रवादीच्या भुजबळांचंही नाव ऐकू येतंय. भाजपाच्याही पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. महायुतीत असं चित्र असतानाच काल शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर या मतदारसंघात आणखी एक ट्विस्ट आला आहे. धर्म अभ्यासक, महर्षी पंचायतन सिद्धपीठम पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. महंत अनिकेत शास्त्री येत्या एक ते दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे सेफ : CM शिंदेंचा निरोप न आल्याने शांतिगिरी महाराजांनी निवडली वेगळी वाट

महंत अनिकेत शास्त्री भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटातील नेत्यांत अस्वस्थता वाढली आहे. खासदार हेमंत गोडसे पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र यंदा या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे.

नाशिक शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खासदार हेमंत गोडसेंनी शहराच्या विकासासाठी चांगलं काम केलं आहे. आता मला संधी मिळाली तर मी देखील शहराच्या विकासासाठी चांगलं काम करेन. महायुतीने जर हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली तर त्यांच्या पाठिशी उभे राहू असेही शास्त्री यांनी स्पष्ट केले. काल मी मुंबईत होतो. तिथे अनेकांच्या भेटी घेतल्या. भाजपने मला तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अनिकेत शास्त्री यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये महायुतीमध्ये जागेचा तिढा सुटेना; शांतीगिरी महाराजांनीही घेतली आघाडी

पहिल्याच दिवशी शांतीगिरी महाराजांचा अर्ज दाखल

नाशिक लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शांतीगिरी महाराज इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. आपण महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत. आपल्याला उमेदवारी दिल्यास आपला विजय निश्चित असल्याचा दावा शांतीगिरी महाराज यांनी केला आहे होता. मात्र शांतीगिरी महाराजांचे नाव मागे राहिले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube