पशुधन वाचवण्यासाठी आमदार तनपुरेंचा आक्रमक पवित्रा; एक तास ठिय्या मांडला…

पशुधन वाचवण्यासाठी आमदार तनपुरेंचा आक्रमक पवित्रा; एक तास ठिय्या मांडला…

Ahmednagar News : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने तालुक्यातील शेतीसाठी व पशुधन वाचविण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या लाभधारक शेतक-यांनी तहसील कार्यालयात सुमारे तासभर ठिय्या मांडलायं. या आंदोलनादरम्यान, अधिका-यांशी सकारात्मक चर्चा होऊन उद्यापर्यंत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन अधिका-यांनी आंदोलकांना दिले आहेत.

शिर्डीत ‘वंचित’ ठरणार गेमचेंजर; घसरलेला मतदानाचा टक्का कुणाला तारक कुणाला मारक ठरणार?

राहुरी तहसील कार्यालयात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली लाभधारक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी आमदार तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील, मुळा डावा कालवा अभियंता अच्चुत गिते, तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरेंसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.

​Horoscope Today: कामात मोठे यश, या राशींसाठी धनलाभाची शक्यता ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य

अधिकाऱ्यांना कोंडून घेण्याचा केला प्रयत्न :
तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू असताना जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी घेतला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात दरवाजा बंद करून लाॅक लावून कोंडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार तनपुरे यांनी विनंती केल्यानंतर मोरे यांनी दरवाजाचा लाॅक उघडला.

जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, असा पाविञा लाभधारक शेतक-यांनी यावेळी घेतला होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत आज सायंकाळी तात्काळ बैठक आयोजित घेत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन भ्रमणध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार तनपुरे यांना दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन आम्ही मागे घेण्यात आलं आहे. तसेच सायंकाळपर्यंत योग्य निर्णय झाला नाही तर उद्या नगर-मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांसह जनावरांसह रास्ता रोको आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशाराही आमदार तनपुरे यांनी यावेळी दिला आहे.

प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा जनतेसमोर आला! वंचितबद्दल पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

या आंदोलनादरम्यान, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, अमृत धुमाळ, दिलीप इंगळे, सुरेश करपे, किशोर महाराज जाधव, रवींद्र आढाव, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब खुळे, ज्ञानेश्वर खुळे, उमेश खिलारी, पंडू तात्या पवार, शिवाजी थोरात, बाळासाहेब गाडे, आदिनाथ तनपुरे, प्रभाकर गाडे, सुनिल मोरे, बाळासाहेब गाडे, नवनाथ थोरात, आदींसह लाभधारक शेतकरी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

आवर्तनाचा निर्णय रद्द झाल्याने तनपुरेंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन!
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नियोजन करुन निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तनपुरेंनी आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यावर निर्णयदेखील झाला होता. मात्र, अचानक हा निर्णय रद्द झाल्याने आमदार तनपुरे यांनी थे जिल्हाधिकाऱ्यांनाच फोन लावला. यावेळी आवर्तन सोडणे गरजेचे असल्याचं तनपुरेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज