प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा जनतेसमोर आला! वंचितबद्दल पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा जनतेसमोर आला! वंचितबद्दल पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

Prithviraj Chavan on Prakash Ambedkar : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार प्रहार केलाय. प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा राज्यातील जनतेने ओळखला आहे असा थेट घणाघात चव्हाण यांनी केला आहे. तसंच, चव्हाण यांनी महाविकास आघाडी, पंतप्रधान मोदी, महायुती यावर भाष्य केलं आहे. त्यांनी एका वृत्तापत्राला मुलाखत दिली त्यामध्ये ते बोलत होते.

 

शरद पवार अन् भाजप नेत्यात फोनवर चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

32 ते 35 जागा महाविकास आघाडीला

यावेळची निवडणूक ही मागे झाली तशी निवडणूक नाही. मोठा बदल यंदाच्या निवडणुकीत जाणवतो आहे असं चव्हाण म्हणाले आहेत. माझं जे आकलन आहे त्यानुसार महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील असा दावा चव्हाण यांनी केला आहे. तसंच, या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार आर्थिक गैरव्यवहार या मुद्यांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असंही चव्हाण म्हणाले.

 

दलित समाज भाजपबरोबर नाही

मोदी सरकार आलं आणि 400 जागा आल्या तर हे लोकं संविधान बदलतील हे सर्वांच्या डोक्यात पक्क बसलं आहे. त्यामुळे देशातील दलित समाज भाजपपासून दूर गेला आहे असा मोठा दावा चव्हाण यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर, 2019 ला प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली त्याचा आम्हाला फटका बसला अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, ते खरंय, पवार आणि ठाकरेंचा पक्ष संपणार बावनकुळेंचा मविआला टोला

आंबेडकरांना 5 जागा देत होतो

यावेळी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले आहेत की यावेळी 2019 सारखी सध्याची परिस्थिती नाही. 2019 ला वंचितला 7 टक्के मतं मिळाली होती. मात्र, त्यावेळी त्यांची एआयएमआयएमशी युती होती. त्यामुळे वंचितचे तीन ते साडेतीन टक्के मत असतील. त्यातील तीन टक्के मतंही वंचितला मिळणार नाहीत असा थेट दावा चव्हाण यांनी केला. तसंच, यावेळी एक टक्काही मत आंबेडकरांना मिळतील की नाही अशी शंका आहे. आंबेडकरांना 5 जागा देत असूनही त्यांनी त्या घेतल्या नाहीत असंही चव्हाण यावेळी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज