पाथर्डीत हायहोल्टेज ड्रामा! भीक मांगो आंदोलन, खुर्च्यांची तोडतोड अन् ढाकणेंचा बाराशे कोटींचा सवाल

पाथर्डीत हायहोल्टेज ड्रामा! भीक मांगो आंदोलन, खुर्च्यांची तोडतोड अन् ढाकणेंचा बाराशे कोटींचा सवाल

Ahmednagar Politics : पाथर्डीमधील नगरपरिषदेच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) आक्रमक झाले आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून (Ahmednagar Politics) आमदार मोनिका राजळेंवर  (Monika Rajale) टीका केली आहे. ‘बाराशे कोटींच्या विकासकामांच्या जाहिराती केल्या. त्यातील किती पैसे तुमच्या खिशात गेले. याचा हिशोब द्यायला मी तयार आहे. त्यासाठी माझी तयारी असून मी सिद्ध करून देतो. गेल्या वर्षभरापासून मतदारसंघातील बाराशे कोटींचा विकासकामाचा हिशोब आम्ही लोकप्रतिनिधींना मागतो मात्र उत्तर मिळत नाही. त्यांची हिंमत होत नाही. आता हे टक्केवारीचा पाप कुणी केले?’ असा सवालही यावेळी प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर केला आहे.

पाथर्डी नगरपरिषदेच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. शहरातील एका रस्त्याच्या कामात दोन ठेकेदारांमध्ये लोकप्रतिनिधींना 20 टक्के कमिशन देण्यावरून वाद झाला. त्यामुळे अर्धवट काम बंद पडले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना, या त्रासाला सामोरे जावे लागत आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार गट) सरचिटणीस प्रताप ढाकणे हे मंगळवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी आंदोलन करत आपला मोर्चा पालिकेवर नेला.

Ahmednagar News : ‘गो बॅक गो बॅक मोदी सरकार गो बॅक’ भाजपच्या रथ यात्रेला शेतकऱ्यांकडून विरोध

यावेळी पालिकेतील मुख्याधिकारी यांच्या दालनातील खुर्चींची मोडतोडही केली. एवढंच नाही तर मुख्याधिकारी यांची खुर्ची इमारतीवरून खाली फेकली गेली. तसेच याप्रसंगी ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. पाथर्डी शहरातील नवीपेठेतील रस्त्याचे काम काही तरुणांनी लोकप्रतिनिधींना हप्ता का दिला नाही, असे म्हणून बंद पाडले. या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात भीक मांगो आंदोलनही करण्यात आले.

यावेळी ढाकणे म्हणाले, पाथर्डी नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शहरात भीक मांगो आंदोलन केले. नागरिकांनी एक-एक रुपया भीक देत संताप व्यक्त केला. जमलेला पैसा नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यास गेलो असता ते कार्यालयात उपस्थित नव्हते. अनेक वेळा संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अनेक वेळा फोन करूनही ते कार्यालयात हजर राहिले नाहीत. रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे शांततेत सुरू आंदोलन संतप्त झाले.

Ahmednagar News : जिल्ह्यावर पुन्हा पकड बनवण्यासाठी शिर्डीत शिबीर; शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरू

दालनात खुर्च्यांची तोडफोड

लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट अधिकारी यांचा निषेध करण्यात आला. आंदोलनप्रसंगी कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. मुख्याधिकारी नसल्याने ढाकणे आणि कार्यकर्त्यांना नगरपालिकेतील संबंधितांकडून सकारात्मक उत्तर मिळाली नाही. त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांची खुर्ची इमारतीबाहेर फेकून दिली. शासनाच्या नियमांनुसार कोणत्याही रस्त्यांची कामे मतदारसंघात झालेली नाही. आपल्या बगलबच्यांना तसेच ठेकेदारांना हाताशी धरून नारळ फोडून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. कोट्यवधींचा निधी आणला असे सांगायचे पण प्रत्यक्षात केवळ 20 ते 25 टक्केच खर्च करायचा बाकी सगळे टक्केवारीत हे पैसे वाटले जाते असा आरोप देखील यावेळी ढाकणे यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज