“शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद”; अजितदादांच्या आमदारांचं मोठं विधान

“शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद”; अजितदादांच्या आमदारांचं मोठं विधान

Narhari Zirwal on Sharad Pawar : ‘शरद पवारांना कुणीच चॅलेंज करू शकत नाही. माझं कामकाज त्यांना माहिती आहे. माझी समाजाला गरज आहे. त्यामुळे शरद पवार दूरून का होईना पण आशीर्वाद देतील’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केलं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं; नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट 

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाने पुन्हा नरहरी झिरवाळ यांनाच तिकीट दिलं आहे. झिरवाळ सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघावरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेला जागा मिळावी यासाठी धनराज महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. उमेदवारी झिरवाळ यांनाच मिळाली. त्यामुळे महाले यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीकडून तिकीटासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, या मतदारसंघातून झिरवाळ यांनी अर्ज भरला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवारांना कुणीच चॅलेंज करू शकत नाही. माझं कामकाज त्यांना माहिती आहे. माझी समाजाला गरज आहे. त्यामुळे शरद पवार दूरून का होईना पण आशीर्वाद देतील’, असे वक्तव्य त्यांनी केले.

दिंडोरीत पवारांचा डाव.. जीवा पांडू गावितांची माघार : भास्कर भगरेसांठी केली लाखभर मतांची सोय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube