जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं; नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट…

  • Written By: Published:
जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं; नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट…

Vidhansabha Election : विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election)अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या. अशातच विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) यांचे चिरजीव गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दरम्यान, या भेटीवर आता नरहळी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली.

पुणे हादरलं! भरदिवसा वाळू व्यावसायिकावर गोळीबार, दोन जणांना अटक 

गोकूळ झिरवाळ यांनी गेल्या महिन्यात शरद पवार गटाच्या मेळाव्यास हजेरी लावली. यामुळे ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, नरहरी झिरवाळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जयंत पाटील आणि गोकुळ झिरवाळ यांच्या भेटीविषयी विचारलं असता ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले होते. जयंत पाटील हा माझा नेता आहे. त्यांचा जाऊन सत्कार कर, अशा सूचना गोकुळला दिल्या होत्या, असं झिरवाळ म्हणाले.

ससून रुग्णालयात चार कोटी १८ लाख रुपयांचा अपहार, अकाउंटंट, रोखपालसह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

पुढं बोलताना ते म्हणाले की, गोकुळला मीच पाठवलं होतं. तिथे त्याला विचारले बापासारखे काही गुण आहेत का, म्हणून त्याने निवडणूक लढवण्याचे सागितलं होतं. त्यामुळं संभ्रम तयार झाला. पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार आहे, असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नरहरी झिरवाळ यांची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते व माजी आमदार धनराज महाले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या जागेवरून धनराज महाले निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. याविषयी विचारले असता झिरवाळ म्हणाले, मी धनराज महाले यांना भेटणार आहे. निवडणून येण्यासाठी उभे राहणार असाल तर ठीक. मात्र, अपक्ष लढून मला अडचणीत आणण्यासाठी निवडणूक लढणार असाल तर निवडमूक लढू नका, अशी विनंती करणार आहे.

राज्य सरकारने धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर काढण्याचा निर्णय घेतला आहे. याला नरहरी झिरवाळ यांनी विरोध केला. झिरवाळ म्हणाले, वर्षानुवर्षे हा विषय सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यावर आमचं दुमत नाही. पण, आमच्यातून देऊ नये. माझी सरकारला विनंती आहे की जसे त्यांना बोलावले जाते तसे आम्हाला बोलवावे. आमचे नेते आहेत, मंत्री आहेत. त्यांना बैठकीत बोलवायला हवे होतं, असं झिरवळ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube