‘मीच अनेक वर्षे फडणवीसांचा मालक होतो’; नाथाभाऊ फडणवीसांना भिडले!
Eknath Khadse replies Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज जळगावमध्ये आहेत. येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर आता येथे राजकीय कलगीतुरा रंगला आहे. फडणवीस यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता तितक्याच तडफेने खडसे यांनी उत्तर दिले आहे.
खडसे यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर विचारले. त्यावर खडसे म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं निमंत्रण मला दिलं आहे. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी मी काळे कपडे घातले आहेत. पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाणार आहे. त्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहील.
भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!
ते पुढ म्हणाले, मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचा मालकच मी बरेच वर्षे होतो. मी सांगायचो त्या प्रमाणे ते करायचे. कारण मी विरोधी पक्षनेता होतो, पक्षाचे नेतृत्वही करत होतो. त्यावेळी मी देवेंद्रजींना सांगायचो हा कागद आणा लगेच ते मला कागद आणून द्यायचे. मी म्हणायचो मला ब्रीफ करून द्या ते मला ब्रीफ करून द्यायचे. मग सारं जर मी देवेंद्रजींकडून शिकलो करून घेतलं तर मी त्यांचा मालक होतो का? ही सहकार्याची भूमिका आहे.
मी नालायक होतो तर इतकी वर्षे माझ्या हाताखाली काम का केलं
मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांसाठी अजित पवार आपल्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं. त्यांच्याबरोबर संसार केला. मग अजित पवार त्यांचे मालक होते का?, त्यांनी आता मालक का बदलवून टाकला?, त्या काळात का नाही बदलला? असे सवाल करत अशा गोष्टी बोलणं म्हणजे हा बालिशपणा आहे. अशा गोष्टी बोलण्यापेक्षा आपले कर्तुत्व सिद्ध करा. कापसाला भाव द्या. कुणाचं तोंड काळं केलं हे जगाला माहिती आहे. ते कशाला बोलता? मी जर नालायक असेल तर अशा नालायक माणसाच्या हाती तुम्ही इतकी वर्षे का काम करत राहिलात? असा रोखठोक सवाल खडसे यांनी फडणवीस यांना केला.
बालिशपणा सोडा, कर्तुत्व सिद्ध करा
माझं सरकारला अजूनही म्हणणं आहे की ते काळं तोंड वगैरे सर्व काही सोडा. आधी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव द्या. शेतकऱ्याला न्याय द्या. हा लढा शेतकऱ्यांसाठी आहे यात माझं व्यक्तिगत काहीच नाही. इतक्या खालच्या पातळीवर देवेंद्र फडणवीस उतरत आहेत तर त्यांचा हा बालिशपणा आहे. या वर्षात जळगाव जिल्ह्यात 551 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांना तुम्ही न्याय देणार आहात की नाही असा सवाल उपस्थित करत टीकाटिप्पणी न करता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा, असे खडसे म्हणाले.
MPSC Student : दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती? पुण्यात एमपीएससी विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला
काय म्हणाले होते फडणवीस?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचे म्हटले. यावर फडणवीसांना विचारले असता त्यांनी खडसेंना जोरदार टोला हाणला. फडणवीस म्हणाले की, काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे. खडसेंना आता नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. ते परिवारात राहिले असते, नवीन मालकाकडे जावे लागले नसते. त्यामुळे अशा काळ्या झेंडाना घाबरणारे लोक आम्ही नाही. असे किती जरी काळे झेंडे दाखवले तरी घाबरणार नाही.