Ahmednagar News : दुष्काळाची दाहकता! महसूल मंत्री विखे पाटलांनी दिल्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

Ahmednagar News : दुष्काळाची दाहकता! महसूल मंत्री विखे पाटलांनी दिल्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

Ahmednagar News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यात आज टंचाई आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विखे पाटलांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

NIA च्या मोस्‍ट वॉन्‍टेड लिस्‍टमधील खलिस्तान्यांना मदत करणाऱ्या गँगस्टर सुखदूल सिंगचा खात्मा

या आढावा बैठकीत संगमनेर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पाणी टंचाईचे सादरीकरण केले. संगमनेर मध्ये २० सप्टेंबर पर्यंत ३९ टक्के पर्यंत १३७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. ४७ टंचाई गावापैंकी २१ गावांत २५ हजार ७७४ व्यक्तींसाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पहिले हे बदला! 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC; लिस्ट दाखवत राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, संगमनेरमध्ये ३८ टक्के पाऊस झाला आहे. आपल्यासमोर पिण्याच्या पाण्याचे आवाहन आहे. धरणातील पाणी आपण पिण्यासाठी राखून ठेवले आहे‌‌. भीषण टंचाईला आपण सामोरे जात आहोत. माणसांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. चारा उत्पादनाचा आपल्यापुढे प्रश्न आहे. चारा निर्मिती करण्यास आपण प्राधान्य देत आहोत. शेतकऱ्यांनी चारा उत्पादन करावे आपण विकत घेऊ. शेतकऱ्यांना ६ रूपये किलोने मूरघास‌ उत्पादन केले जाणार असल्याचं विखेंनी स्पष्ट केलं आहे.

NCP Crisis : पक्षात फूट नाहीच पण.. भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

तसेच तहसिलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्या अहवालावर‌ गावांना टॅंकरने पुरवठा करण्यात येईल.‌ विहिरीत पाणी न टाकता पाण्याच्या टाकीतूनच पाण्याचा पुरवठा करावा. चारा मागणी असेल ती नोंदवावी. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. गावकऱ्यांची मागणी आल्यापासून पाच दिवसांत टॅंकर सुरू झाला पाहिजे. जीवन प्राधिकरणाच्या सर्व योजना कार्यान्वित करण्यात यावे. टॅंकरचे वेळापत्रक तयार करावे. ग्रामसेवक व तलाठ्यांनी हजर राहिले पाहिजे. जनतेला वेळेत सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे काम आहे. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील या़ंनी यावेळी दिल्या.

दरम्यान, पठार भागात प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी पाहणी दौरे करावेत. पठार भागाचा स्वतः दौरा करून समस्या समजून घेणार असल्याचे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी‌ अनिल नागणे आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube