‘लोकशाहीचा स्तंभ वाचवा’; राहुरी दुहेरी हत्याकांड प्रकरणी सत्यजित तांबेची मागणी

‘लोकशाहीचा स्तंभ वाचवा’; राहुरी दुहेरी हत्याकांड प्रकरणी सत्यजित तांबेची मागणी

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकिलांचे दुहेरी हत्याकांड घडले यावर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राहुरी येथे वकील दांपत्याचे दुहेरी हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे राज्यातील वकील हे हादरवून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मध्येच न्यायव्यवस्थेची चौथा स्तंभ मानला जातो याची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे असे मला वाटते असं आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले तांबे म्हणाले आहेत.

राहुरी येथील घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सत्यजित तांबे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जात जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली. तसेच वकील संघटनेच्या या आंदोलनाला पाठिंबा देताना त्यांनी आपण सरकारकडे याबाबत पाठपुरावा करत आहोत तसेच. जिल्ह्यात घडलेल्या हत्याकांडाने राज्यातील वकील संघटना या आदरवून गेल्या आहेत. वकील संरक्षण कायदा राज्यात लागू करावा अशी मागणी वकील संघटनांकडून करण्यात येत आहे यावर बोलताना तांबे म्हणाले की वकील संघटनांना संरक्षण देण्यासाठी आता सरकारने जो कायदा इतर राज्याने लागू केलेला आहे तोच कायदा आता अधिवेशनामध्ये उपस्थित करणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे तांबे म्हणाले.

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी दोघे ताब्यात; मुंबई पोलिसांची कारवाई

हे वकील संरक्षण कायदा हा राज्यात अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे असं तांबे म्हणाले. या कायद्याच्या अंमलबजावणी बाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे तसेच या घटनेबाबत कम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील मी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचे देखील यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले.

जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकिल पती-पत्नीचे अपहरण कूरन खून केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळब उडाली होती. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. दरम्यान, राहुरी येथील वकिल दाम्पत्याची हत्या झाल्यानंतर राज्यभर वकिलांचे धरणे आंदोलन सुरू आहेत.

वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत असून ही चिंतेची बाब आहे. वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये तातडीने वकिल संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून वकील संरक्षण कायद्याची मागणी केली जात आहे. मात्र, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. आणि अशातच वकिलांवर हल्ले होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळं वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू करावा या मागणीसाठी शहर वकील संघटनेच्या सर्व वकिलांनी कामकाज बंद ठेवत धरणे आंदोलन सुरु केले आहे. नगर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व भाजपा वकिल आघाडीच्यावतीने वकिलांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज