अहमदनगर : हरिश्चंद्रगडावर 6 पर्यटक भरकटले; एकाचा मृत्यू : घनदाट जंगलात नेमकं काय घडलं?

अहमदनगर : हरिश्चंद्रगडावर 6 पर्यटक भरकटले; एकाचा मृत्यू : घनदाट जंगलात नेमकं काय घडलं?

अमहदनगर : जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर फिरायला गेलेल्या पुण्यातील 6 पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिरताना गडावरील घनदाट जंगलात हरविल्याने गुरुवारी संध्याकाळी या सहाही जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला. मात्र पावसामुळे आणि थंडीमुळे यातील एकाचा मृत्यू झाला. अनिल गिते असं मृत पर्यटकाचं नाव आहे. तर अन्य 5 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (one of the 6 tourists from Pune who went for a walk at Harishchandra gad has died.)

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला सुट्टी असल्याने अनिल गिते, अनिल आंबेकर, गोविंद आंबेकर, तुकाराम तिपाले, महादू भुतेकर आणि हरिओम बोरुडे हे सहा तरुण पुण्यातील लोहगाव परिसरातून हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी गेले होते. प्रवासाचे अंतर जास्त असल्याने त्यांना पोहचायला दुपारी 3 वाजले. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तोलार खिंडीतून हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात केली.

भाजप-सेना युती अभेद्य…नगर मनपावर युतीचा झेंडा फडकविणार; भाजप निवडणुकीच्या तयारीला

परंतु एक तासाभरात अंधार पडला, दाट धुकं आणि मुसळधार पावसामुळे सहाही जण रस्ता भरकटले. त्यामुळे सर्वांनी डोंगर कपारीचा आसरा घेत मुक्काम केला. मात्र पाऊस आणि थंडी यामुळे काही वेळातच गिते यांना त्रास होण्यास सुरुवात झाली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गिते यांचा मृतदेह ताब्यात घेतला. तर अन्य 5 जणांना रेस्क्यू केले. दरम्यान, रेस्क्यू करण्यात आलेल्या 5 पर्यटकांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

‘अदानींची गाडी कर्जत-जामखेडला का वळवली नाही?’ राम शिंदेंचा पवारांना खोचक सवाल

मागील दोन महिन्यांपासून राज्यात पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, कोकण या भागातील गडकिल्ले, घाटमाथे आणि धबधब्यांवर पर्यकट गर्दी करत आहेत. गडकिल्ल्यांवर जात ट्रेकिंगचा आनंद घेताना दिसून येत आहेत. मात्र हरिश्चंद्रगडावर घडलेल्या या दुर्घटनेनंतर पर्टकांना काळजी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube