माझंही 2019 ला तिकीट कापलं पण मी साथ दिली; “लेट्सअप चर्चेत” स्मिता वाघ थेट बोलल्या
Smita Wagh Interview : मला वाटलं नव्हत उन्मेश पाटील इतक्या लवकर भूमिका बदलतील असं म्हणत जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी खंत व्यक्त करत पाटील यांच्यावर टीकाही केली. त्या लेट्सअप मराठीच्या “लेट्सअप चर्चा” या कार्यक्रमात बोलत होत्या. तसंच, पक्षात 10 वर्ष काम करणारा माणूस इतक्या लवकर कसा बदलतो हे मला कळलं नाही असंही (Smita Wagh ) वाघ यावेळी म्हणाल्या.
लढत अर्धी-अर्धी होणार नाही
वर्षानुवर्ष येथे भाजपचीच सत्ता आहे. आमचं केडर येथे मजबूत आहे असं म्हणत ही लोकसभेची लढाई अर्धी-अर्धी अशी अजिबात होणार नाही असंही स्मिता वाघ म्हणाल्या. त्यावेळी त्यांनी विद्यमान खासदारांच तिकीट कापलं ही चर्चा होत असली तरी त्यांनी लोकांची किती काम केलं हे पाहिलं पाहिजे असं म्हणत स्मिता वाघ यांनी पाटील यांच्या कामावर यावेळी शंका उपस्थित घेतली.
दुसऱ्याच दिवशी आम्ही मैदानात उतरलो
2019 ला माझही तिकीट कापलं. परंतु, आम्ही थांबलो नाही. तिकीट मिळालं नाही हे स्पष्ट झालं की दुसऱ्याचं दिवशी आम्ही मैदानात उतरलो. प्रचार केला. आम्हाला यावेळी उन्मेश पाटलांकडून हेच अपेक्षित होतं. परंतु, त्यांनी वेगळा विचार केला अशी स्पष्ट भूमिका स्मिता वाघ यांनी यावेळी मांडली.
विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं म्हणून त्यांना सहानुभूती मिळेल असं अजिबात नाही. लोकांना काम पाहिजे. त्यामुळे इथ सहानुभूतीचा परिणाम होणार नाही असंही स्मिता वाघ म्हणाल्या. तसंच, ज्या दिवशी मला उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी मी त्यांची भेट घेतली. त्यावेळी उन्मेश पाटील यांनी तुम्हाला साथ देणार म्हणून मला शब्द दिला. परंतु, पुढे तसं झालं नाही असंही वाघ यावेळी म्हणाल्या.