धक्कादायक! जळगावमध्ये अज्ञातांकडून धावत्या ट्रेनवर दगडफेक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! जळगावमध्ये अज्ञातांकडून धावत्या ट्रेनवर दगडफेक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Stone pelting on passenger train in Jalgaon : जळगाव जिल्ह्यामध्ये पॅसेंजर ट्रेनवर (passenger train) दगडफेक (Stone pelting) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अमळनेर परिसरात अनेक आज्ञातांनी धावत्या ट्रेनवर दगडफेक केल्याची ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांनी भीतीने धावपळ करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जलवा; भाजपला धक्का देत सहा जागा जिंकल्या

ही दगडफेक भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनवर शुक्रवारी (12 जुलै) सकाळी करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या संदर्भात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अद्याप कोणत्याही प्रवाशांनी तक्रार केलेली नसल्याने पोलिसांनी स्वतःहून या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पूजा खेडकर प्रकरणाचे नगर कनेक्शन; जिल्हा रुग्णालयातून मिळाले होते दिव्यांग प्रमाणपत्र

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जिल्ह्यातील अमळनेर परिसरातून ही ट्रेन जात असताना परिसरात प्रचंड मोठा जमाव गोळा झालेला आहे. त्यांच्याकडून अचानक या ट्रेनवर दगडफेक करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला असून त्यांच्याकडून एकमेकांना खिडक्या लावण्याचे आवाहन केले जात आहे.

या ट्रेनमधून मोठ्या संख्येने प्रवासी भोरतकच्या दिशेने एका धार्मिक कार्यक्रमाला जात होते असं सांगितलं जात आहे. तसेच या ट्रेनमध्ये काही सीआरपीएफचे जवान देखील होते. मात्र अद्यापही या घटनेचे गुढ उकडलेले नाही. पोलिसांकडून त्या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube