धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही, डॉ. सुजय विखेंचा इशारा

  • Written By: Published:
धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नाही, डॉ. सुजय विखेंचा इशारा

Dr. Sujay Vikhe : गेल्या 70 वर्षात शिर्डी मतदारसंघातील (Shirdi Constituency) कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही. पण आज असं काय झालं की, प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात असल्याचं वाटू लागलं. महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे, त्याबद्दल मला काही माहित नाही. परंतु, शिर्डी मतदारसंघात आपण सर्वजण एक आहोत, त्यामुळं धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉ. सुजय विखेंनी (Dr. Sujay Vikhe) दिला.

Sharvari Wagh : कतरीना, माधुरी अन् श्रीदेवीमुळे शर्वरीला डान्सची आवड, आता आलियासोबत करणार स्क्रीन शेअर 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे युवक- कार्यकर्त्याशी संवाद साधताना माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी बोलतांना डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, ज्या दारूड्याला घरात आणि गावात कोणी विचारत नाही. तो मोबाईलवर एखादं स्टेटस ठेवतो आणि आपण गाव बंद ठेवतो. आपण सुशिक्षित असूनही भरकटत चाललोय का? तुमचं शिक्षण घेऊन काय उपयोग झाला, असा सवाल विखेंनी उपस्थित करत डॉक्टर असून जर मी भेदभाव मिटवू शकलो नाही तर माझ्या शिक्षणाचा उपयोग काय? असा सवाल विखे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही आणि मुलींची सुरक्षितता भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच घरातील असून महाराष्ट्रात दोन वेगवेगळे पक्ष चालवत असल्याचं सांगून विखेंनी कार्यकर्त्यांनी आता एकमेकांच्या तक्रारी करण्यात वेळ न घालवता विविध योजना घरा-घरात पोहोचवाव्यात, असं सांगितलं. तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवून तरुण कार्यकर्त्यांशी स्पर्धा न करण्याचा सल्लाही विखेंनी दिला.

काम करण्यासाठी मला पदाची गरज नाही…
पुढं ते म्हणाले, स्व. बाळासाहेब विखे पाटील, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी या दिग्गज नेत्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आश्वी बुद्रुक येथे माझा पराभव झाल्याचा जल्लोष करण्यात आल्याची खंत बोलून दाखवतांनाच मला काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसल्याचे, विखे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube