Trimbakeshwar Temple : आधी मंदिरात पोहोचायचं मग जागेचा दावा करायचा, तुषार भोसलेंनी उकरला नवा वाद

Trimbakeshwar Temple  :  आधी मंदिरात पोहोचायचं मग जागेचा दावा करायचा, तुषार भोसलेंनी उकरला नवा वाद

Trimbakeshwar Temple : आधी मंदिरात पोहोचायचं अन् मग पूर्वज धूप दाखवत होते म्हणून मंदिरात आमची जागा असल्याचा दावा करायचा पण हिंदु आता ताकही फुंकून पित असल्याचं म्हणत भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवणाऱ्यांना खडसावलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याच्या प्रकारावरुन तुषार भोसले यांनी मंदिर प्रशानसाची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी भोसले धूप दाखवण्याची परंपरा म्हणणाऱ्यांवर रोख ठेऊन बोलत होते.

अतिक अहमदची हत्या अन् लॉरेन्स बिन्शोई गँगचे कनेक्शन उघड; हल्लेखोरांची NIA समोर कबुली

तुषार भोसले म्हणाले, सध्या सोशल मीडियावर त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्यासंदर्भातला एक व्हिडिओ प्रसारित केला जात आहे. या मागीलवर्षीचा व्हिडिओ असून हा व्हिडिओ संदल आयोजकांनी शूट करुन प्रसारित केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने हा व्हिडिओ प्रसारित केलेला नाही. यावरुन संदल आयोजक मागील वर्षी मंदिरात जाऊ दिलं मग यावर्षी का नाही? असा सवाल उपस्थित करीत आहेत.

Jayant Patil यांची आज ईडी चौकशी : राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आक्रमक

यावेळी बोलताना त्यांनी संदल आयोजकांची खरी हकीकत काय आहे? ही स्पष्ट केली आहे. ते म्हणाले संदल आयोजकातील चार जणांपैकी एकाच नाव सलमान अकील सय्यद असं आहे. त्याच्यावर 2018 साली एका 14 वर्षीय हिंदु मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एवढंच नाहीतर त्याच्यावर इतरही अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

अमेरिका हादरली! कार शो सुरु असतानाच अंदाधुंद गोळीबार, 10 जण ठार …

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर न्यायालयात खटले सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा युवक हिंदु भगिनीवर अत्याचार करतो, तिला ब्लॅकमेल करतो, धमकी देतो, त्यानंतर त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला जातो. तसेच अशा लोकांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

शपथविधी सिद्धरामय्यांचा… पण चर्चा शरद पवार- राहुल गांधींच्या फोटोची!

आता हिंदु समाज ताकही फुंकून पिणार आहे. या प्रकरणात आमचा पोलिसांवर विश्वास आहे. याचा ते छडा लावतील. या प्रकरणातील आरोपींची ते कसून चौकशी करुन आम्हाला न्याय देणार असल्याचं ते म्हणाले आहेत. या प्रकरणी मंदिर समितीने पुढाकार घेऊन आमच्या मंदिरात अशी कोणतीही परंपरा नसल्याचं एसआयटीला सांगितल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल आयोजकांकडून धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, धूप दाखवण्याच्या या परंपरेला मंदिर प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube