निळवंडेतून आवर्तन कधी सुटणार? महसूल मंत्री विखेंनी सांगूनच टाकलं

निळवंडेतून आवर्तन कधी सुटणार? महसूल मंत्री विखेंनी सांगूनच टाकलं

Radhakrushna Vikhe Patil : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली.

‘बहिर्जी’ म्हंजे शिवबाची तळपती तलवार”; हिंदवी स्वराज्याच्या सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणारा सिनेमा

प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन सोडण्याची सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथील उपविभागीय कार्यालयात जलसंपदा विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुळा गोदावरी आणि प्रवरा धरण समूहाच्या आवर्तनाचा आढावा घेण्यात आला.

निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी माहिती जाणून घेतली. सर्व तांत्रिक काम पूर्ण झाली असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या मुहूर्ताचे औचित्य साधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचेल यासाठी दिड टिएमसी पाण्याचा वापर करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Kanni New Poster : मकर संक्रांत अन् पतंग उडवण्याचा आनंद लुटत, ‘कन्नी’चे नवीन पोस्टर झळकले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन आणि डाव्या कालव्याचं उद्घाटन झालं. डाव्या कालव्यामुळे आता नगरसह, नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहेत.

धरणाचा एकूण पाणीसाठा २३६ द.ल.घमी (८.३२ TMC) आहे. या प्रकल्पाच्या ८५ किमी लांबीच्या डाव्या व ९२.५० किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे तसेच जलाशयावरील ४ उपसा सिंचन योजना तसेच उच्चस्तरीय पाईप कालव्यांद्वारे एकूण ६८ हजार ८७८ हेक्टर एवढी सिंचन क्षमता प्रस्तावित करण्यात आली आहे.

मातोश्रीबाहेर घातपाताचा कट? संजय राऊत म्हणाले, ‘भाजपचं षडयंत्र, ठाकरेंच्या सुरक्षेची जबाबदारी…’

या प्रकल्पामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील २४ गावांमधील ४ हजार २३५ हेक्टर, संगमनेर तालुक्यातील ८० गावांमधील २५ हजार 428 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील ११ गावांमधील ५ हजार ६६६ हेक्टर, राहाता तालुक्यातील ३७ गावांमधील १७ हजार 231 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

दरम्यान, या बैठकीस नाशिक जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे अधिक्षक अभियंता महेंद्र आमले, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, मुळा लाभक्षेत्राच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, प्रवरा लाभक्षेत्राचे स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता कैलास ठाकरे, कार्यकारी अभियंता कैलास हापसे आदी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube