कुटुंब सोबत असताना किंवा नसतानाही मी भाजपसोबतच होते -रक्षा खडसे

कुटुंब सोबत असताना किंवा नसतानाही मी भाजपसोबतच होते -रक्षा खडसे

Raksha Khadse Interview : सुरूवातीपासून मी भाजपसोबत आहे. 2014 पासून मी राजकारणात काम करते. आज कुटुंब सोबत आहे. मी काही काळ कुटुंब सोबत नसतानाही भाजपमध्ये काम केलं आहे. रोहिणी खडसे यांचा कोणताही निर्णय असला तरी मी त्यांच्या निर्णयावर बोलू शकत नाही. काय करायचं आणि त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांचं काम आहे असं म्हणत रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसे यांच्यावर जास्त बोलणं टाळलं. त्या लेट्सअप मराठीच्या “लेट्सअप चर्चा” या कार्यक्रमात बोलत होत्या.

 

निवडणुका पार पडल्यावर प्रवेश

आपल्या घरात वाद असतात, भाजप तर एक मोठा पक्ष आहे. त्यामुळे काही मतभेद जरून असतात असं म्हणत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या राजकीय वादावर रक्षा खडसे यांनी भाष्य केलं. तसंच, सर्व घटना अचान घडल्याने या निवडणुका पार पडल्यानंत एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश होईल यावरही रक्षा खडसे यांनी भाष्य केलं.

 

आमचा विजय नक्की होईल

कोणतीही निवडणूक ही निवडणूक आहे. आम्हीच एका बाजूने जिंकू असं आमचं मत नाही. परंतु, समोरच्या पक्षाकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही असं म्हणत रक्षा खडसे यांनी पंतप्रधान यांचं समर्थन यावेळी केलं. तसंच, माझ्या मतदारसंघात अर्धी-अर्धी लढाई होईल असं नाही. आम्ही काम केल्याने लोकं आमच्यासोबत आहेत. त्यामुळे जास्त मतांनी आम्हीचं निवडून येणार असंही रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या.

 

कुटुंब सोबत आहे

तसंच, कुणाला वाटतं असेल की माझं कुटुंब माझ्यासोबत नाही. तर माझ्यासोबत आई, नणंद सासरे, माहेरचे सर्व मंडळी आहेत. असा दावा करत त्यांनी रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत असल्या तरी त्याबद्दल आम्हाला काही भूमिका घ्यायची नाही. किंवा त्यावर आम्हला काही बोलायचं नाही असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज