अहमदनगर : आईच्या झोपेच्या गोळ्या अन् दरोड्याचा बनाव : पत्नीने थंड डोक्याने काढला पतीचा काटा

अहमदनगर : आईच्या झोपेच्या गोळ्या अन् दरोड्याचा बनाव : पत्नीने थंड डोक्याने काढला पतीचा काटा

Crime : अहमदनगर : शारिरीक आणि मानसिक छळाला वैतागून पत्नीनेच दरोड्याचा बनाव रचून पतीची हत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात एकलहरे- बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नईम पठाण असं मृत पतीचं नाव आहे तर, बुशरा पठाण असं आरोपी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी पत्नी बुशरा आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केलं आहे. (wife herself has killed her husband by faking a robbery)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात एकलहरे- बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरोडेखोरांनी व्यावसायिक नईम पठाण याची हत्या करून सात लाखांची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना घडली होती. पठाण यांची पत्नीला देखील मारहाण झाल्याचा बनाव करण्यात आला.

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी कधी सुटणार? पालकमंत्र्यानी सांगितली तारीख

मात्र पत्नीने सांगितलेली हकीकत आणि घटनास्थळावरील परिस्थिती या गोष्टी वेगवेगळ्या असल्याने हे प्रकरण दिसतं तसं नाही असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. दरोड्याचा बनाव करत पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नईम पठाण याची पत्नी बुशरा पठाणनेच पतीला मारल्यानंतर दरोड्याचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गतिमान कसलं, हे तर गतिमंद सरकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मंत्र्यांना टक्केवारी; प्राजक्त तनपुरेंचा हल्लाबोल

पती मागील अनेक दिवसांपासून शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. याला वैतागून पत्नीनेच हा बनाव रचला. पत्नीने आईच्या उपचारामध्ये सुरु असलेल्या झोपेच्या गोळ्या पतीला दुधातून खाऊ घातल्या. आईला भेटण्यासाठी गेल्यानंतर दरवेळी ती एक गोळी काढून आणत असे. त्यानंतर साडीने गळा आवळून पतीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी नईमची पत्नी बुशरासह आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनीच मिळून दरोडेखोरांनी मारहाण करत घरातील ऐवज चोरून नेल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube