- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सीमावाद मुद्दा…विरोधकांनी गोंधळ घालून सभात्याग केला
नागपूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन राज्यात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसून येत आहे. आज विधानसभेत सीमावादावर प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र हा प्रस्ताव आजही मांडण्यात येणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यानंतर विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी आज […]
-
‘हेच’ संघाचे संस्कार का? सामनातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, नागपुरात तब्बल 110 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीनचिट देत फिरताहेत. भाजपचे लोक सत्यवचनी रामाचं नाव घेत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचं भजन गात आहेत. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणायचे का? […]
-
शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंच्या हाती मोठे गुपित; राजीनाम्याची करणार मागणी
मुंबई : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हे नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात दिसून येत आहेत. उद्धव यांचे पुत्र आदित्य आदित्य यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे गट आणि भाजप यांनी जोरदार डावपेच टाकल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे हे आज विधान परिषदेत बोलण्याची शक्यता आहेत. एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ठाकरे मोठा बॉम्बस्फोट ते […]
-
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे ‘हे’ गंभीर पाऊल उचलण्याच्या तयारीत
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारनं एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे गटाचे नेते सातत्यानं आदित्य ठाकरेंवर आरोप करत आहेत. आता या प्रकरणी आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत आहेत. आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे. वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. […]
-
कुलू-मनालीत पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यातील सुरज शहाचा मृत्यू
कुलू : हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली येथे पॅराग्लायडिंग दरम्यान पॅराशूटचा बेल्ट निसटून झालेल्या अपघातामुळं साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील आहे. सुरज शहा असं मृत तरुणाचं नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. या घटनेमुळं शिरवळ शहरावर शोककळा पसरलीय. सुरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी […]
-
बायकोच्या साडीसाठी 200 नव्हते, आता…कोट्यवधींचा बंगला
सोलापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार शाब्दिक टीका केली आहे. बायकोला साडी घेण्यासाठी २०० रुपये नाहीत, असं म्हणणारे शहाजीबापू पाटील कोट्यवधींचा बंगला कुठल्या पैशांतून बांधत आहेत, असा सवाल अंधारेंनी विचारला. दरम्यान अंधारे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून त्या विविध मतदारसंघांना भेटी देत […]










