.. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो; आंबेडकरांनी सांगितंल गाठीभेटी वाढण्याचं कारण

.. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो; आंबेडकरांनी सांगितंल गाठीभेटी वाढण्याचं कारण

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आंबेडकर यांचे कौतुक केले होते.

त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एक मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर वाढलेल्या भेटीगाठी आणि फडणवीस यांनी केलेले कौतुक यांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आंबेडकर म्हणाले, ते मुख्यमंत्री आहेत आणि आपल्याला लोकांची कामे करून घ्यायची असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटावच लागणार आहे.

Letsupp Special : विश्वस्तपद, आंदोलन अन् वाद; जेजुरीची ग्राउंड रिअ‍ॅलिटी नेमकी काय?

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अशा प्रकारच्या चर्चा होत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांना म्हणालो होतो, तुम्ही बाहेर या, आम्ही तुमच्याबरोबर बसायला तयार आहोत. परंतु, भाजपसोबत बसणं कठीण आहे, त्यांच्यासोबत आम्ही बसणारच नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावरून वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा आंबेडकरांना भाजपात येण्याची ऑफर दिली होती. त्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. प्रकाश आंबेडकर यांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो असं आठवले सोमवारी म्हणाले होते.

Video : ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मनोज वाजपेयीची लढाई

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube