पार्थ पवार जमीन प्रकरण : अधिकारी जितका भ्रष्ट तितका राजकारण्यांचा लाडका : कुंभार
Vijay Kumbhar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांना पुण्याचे तहसीदार सूर्यकांत येवले यांच्यावर अनेक गंभीर आरोप
Vijay Kumbhar On Suryakant Yevale : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांना पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. अमेडिया (Amedia) कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी पुण्याचे तहसीदार सूर्यकांत येवले सक्रिय होते असा आरोप विजय कुंभार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच तहसीलदार सूर्यकांत येवले यांना नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? यावर स्पष्टीकरण देण्यात यावा अशी मागणी देखील विजय कुंभार यांनी केली आहे.
विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी एक्सवर केलेल्या एक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या ( Suryakant Yevale) निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?. सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमधे नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे. ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती? की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली? केली असेल कोणी केली? नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार?
येवलेंचे काही पराक्रम पुढील प्रमाणे ….
येवले यांनी 2001 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. 361 गुण आणि अपंग (कर्णबधिर) कोट्यातून पास झाल्याने त्यांना नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आले. पण खरंच कर्णबधिर आहेत का? नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल !त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असे म्हणतात. 2001 चा MPSC घोटाळा गाजला होता . 398 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या,प्रत्येकाकडून ₹3–₹5 लाख घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई HC ने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता ज्याची सेवेत रुजू होतानाची कारकीर्द अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल ? येवले यांना 2011 मध्ये उमरेड (नागपूर) येथे ₹10,000 ची लाच घेताना पकडले .6 दोषारोपपत्रं ठेवण्यात आली, पण चौकशीचा पत्ता नाही. त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पण सेटिंग लावून परत रुजू झाले .
पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?.
सर्वोच्च… pic.twitter.com/xxM6OQ6Wne
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) November 12, 2025
2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून ₹2–₹2.5 लाख लाच घेतल्याचा आरोप . हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असे जाहिर केले. 2016 मध्ये पुणे विभागात बदली. पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी – मंत्रालयातून “सेटिंग” करून पोस्टिंग. 2016 मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू 58 सरकारी जमिनींचं अनियमित वाटप,वाळूमाफियाकडून संगनमत यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी निलंबन केलं.
अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट
14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचाव! मोबोज हॅाटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आले, आंदोलने झाली परंतु पुढे काहीच झाले नाही. येवले “मुंढवा जमीन घोटाळा” प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय असल्याचा आरोप देखील या पोस्टमध्ये विजय कुंभार यांनी केला आहे.
