‘उद्धव ठाकरेंनी ‘ते’ बंड सहज थांबवलं असतं पण… दानवेंचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या बंडामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आणता आले. या घडामोडींना एक वर्ष उलटून गेले तरीही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या बंडाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे.
दानवे म्हणाले, ही सगळी गद्दारी भारतीय जनता पार्टीच्या तालावर ईडीच्या भीतीने भ्रष्टाचार लपविण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडल्या. ज्या शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात मोठे झाले त्याच शिवसेनेला फोडण्याचे पाप भाजपने (BJP) केले.
‘रामदास कदम यांना राष्ट्रवादीत जायचं होतं, पण… : सुनिल राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
आमची वेळ येऊ द्या, आजिबात सोडणार नाही
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टक्केवारी बंद केली होती म्हणूनच हे सगळं बंड घडलं आहे. जे लोक गेलेत ना गद्दार त्यांचे आता धंदे काय सुरू आहेत ते पहा ना. बदल्यांमध्ये किती घेतात?, कामं कशा पद्धतीने विकतात? नुसता धिंगाणा चालू आहे. मंत्रालयात जाऊन पहा ऑर्डर कुणाच्या निघतात? कामं कुणाला दिली जातात? आणि कामं कशी होतात?, हे सगळं निघणार आहे येणाऱ्या काळात आम्ही आजिबात सोडणार नाही, असा इशारा दानवे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, उद्धव साहेबांनी तुमची टक्केवारी बंद केली होती, तुमचे धंदे बंद केले होते. या गोष्टी तुम्हाला सहन होत नव्हत्या म्हणून तु्म्ही या सगळ्या गोष्टी केल्या हे आता स्पष्ट होत आहे.
गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंनी ठरवलं असतं तर त्यांना हे बंड सहज थांबवता आलं असतं. ते काही फार अवघड कामही नव्हतं. पण, उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ज्याच्या मनात गद्दारी रुजलेली आहे त्याला माझ्यासोबत का ठेवायचं. ज्यावेळी ते लोक गेले त्यावेळी संध्याकाळी त्यातील निम्मे लोक उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच वर्षा बंगल्यावरच बसलेले होते. त्यावेळी त्यांनी ठरवलं असतं तर काहीही करता आलं असतं. या लोकांना जर जाऊच द्यायचं नसतं तर राज्याची हद्दही पार करू दिली नसती. पण उद्धव ठाकरेंनी सत्ता वाचविण्यासाठी किंवा खुर्ची टिकविण्यासाठी यांच्यासारखे कोणतेच काम केले नाही. यांनी गद्दारी केली. भाजपने सुद्धा फोडाफोडी केली. कशासाठी तर सत्तेसाठी त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवूच नये.
शिंदे गटात गेलेल्यांची चौकशी का नाही ?
मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. ईडी केवळ शिवसैनिकांवर पक्षपातीपणे कारवाई करत आहे, असा आरोप दानवे यांनी केला.