राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारिणीवर पटेल, तटकरेंचं नाव; पार्थ पवारांनी आपली कोणते मित्र घुसवले?

या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचे सुद्धा नाव आहे.

News Photo   2026 05 12T213519.313

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन (NCP) मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचे नाव नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, ते पत्र खर की खोट अशी चर्चा सुरु झाली असून आता नवी पत्र समोर आलं आहे. यामध्ये पटेल, तटकरे, भुजबळ, वळसे पाटील यांची नाव आहेत. मात्र, पक्ष पातळीवर यांच्याकडं कुठलंही पद दिलं नसल्याचं यामध्ये दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांचे काम यासंदर्भात सविस्तर यादी 29 एप्रिलला दिल्याचे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचे सुद्धा नाव आहे. त्याचबरोबर नवीन फळीतील सना मलिक, धिरज शर्मा, सरोज आहिरे, राणा रणवीर, रमनप्रीत यांचीही नाव आहेत. यावरून आता पार्थ पवार यांनी आपली मित्र या यादीत घुसवली अशी चर्चा सुरू झाली आहे.

follow us