ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही, प्रफुल पटेल स्पष्टच बोलले

Praful Patel : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. आगामी निवडणुकांसाठी महायुती आणि

  • Written By: Published:
Praful Patel

Praful Patel : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. आगामी निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु असून बेरीज – वजाबाकीचा राजकारण देखील सुरु झाला आहे. यातच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये आगामी निवडणुकांसाठी युती होणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणाला याचा मोठा फटका बसणार यावर सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे जर ठाकरे बंधू एकत्र आले तरी देखील काहीच फरक पडणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी केला आहे. ते आज गोदिंयामध्ये पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र येणार असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी परत महाविकास आघाडी (MVA) तयार करावी मात्र कितीही एकत्र आले तर काही फरक पडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. आता राज्यातील जनता समजदार झाली असून कोणाची युती झाली तरी काही फरक पडणार नाही असा दावा पत्रकारांशी बोलताना खासदार प्रफुल पटेल यांनी केला आहे.

तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही मुख्य पक्ष एकत्र निवडणुका लढवणार नसल्याचे संकेत सध्या मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील यांचे संकेत दिल्याने सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. मात्र उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यांना सिरीयस घ्याचे काही कारण नाही असं देखील प्रफुल पटेल म्हणाले आहे. असे स्थानिक पातळीवर केलेल्या वक्तव्यांना सिरीयस घ्यायचे नसते. स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व दाखविण्याचा अधिकार असतो. त्याच्यामुळे त्याला इतकं सिरीयस घ्यायचं नसतं असं प्रफुल पटेल म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते उदय सामंत ?

निडवणुकीमध्ये जो कोणी स्वबळाची भाषा करत आहे, त्यांनी खरोखरच स्वबळावर लढावे. मग काय करायचे ते आम्ही ठरवू. परंतु, आम्ही महायुतीचा धर्म पाळण्याचे ठरवले आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यास सांगितले आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे होईल असं पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी मित्रपक्षांना इशारा दिला होता.

follow us