राष्ट्रवादी अन् कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष…; आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र
Prakash Ambedkar : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही कोणताही आरक्षणावर ठोस निर्णय झाला नाही. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली.
Exclusive: CM एकनाथ शिंदेची सिनेमात एन्ट्री, ‘धर्मवीर 2’ मध्ये साकारणार स्पेशल रोल
प्रकाश आंबडेकरांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, जे स्वत:ला राजकीय नेते म्हणतात, ते नेते आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेत नाहीत. त्यांनी लोकांना वाऱ्यावर सोडलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. भाजप हा वैदीक ब्राम्हणांचा पक्ष आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) हा सीकेपीचा पक्ष आहे. या पक्षांना ओबीसींचं काही देणं-घेणं नाही, अशी टीका आंबेडकरांनी केली.
एकनाथ शिंदेंनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन… 110 जागांवर सुरु केली विधानसभेची तयारी
पुढं बोलतांना ते म्हणाले, राजकीय पक्ष पळवाटा काढत आहेत. हे राजकीय पक्ष ओबीसींबाबत कोणतीही भूमिका घेणार नाहीत. त्यांनी ओबीसींबाबत भूमिका घेतली नाही तर मागासवर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय अन् न राहिले काय, याचंही त्यांना देणं-घेणं नाही, असंही आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर म्हणाले, आमचं सरळ म्हणणं आहे की, प्रत्येक पक्षाला स्वत:ची भूमिका असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी राजकीय पक्ष आपला निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा बाळगतो, असं आंबेडकर म्हणाले.
येत्या 25 जुलैपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणाही आंबेडकरांनी केली. संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. 7 किंवा 8 ऑगस्टला सांगता होतील, या यात्रेत बैठका आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत, असं आंबेडकर म्हणाले.