येवू का कणकवलीत? नारायण राणेंच्या धमकीनंतर, प्रकाश महाजनांनी थोपटले दंड

येवू का कणकवलीत? नारायण राणेंच्या धमकीनंतर, प्रकाश महाजनांनी थोपटले दंड

Prakash Mahajan Challenge To Narayan Rane : मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. राणेंसोबतच्या वादानंतर (Narayan Rane) पोलीस महाजन यांच्या घरी गेल्याचं समजतंय. धमकीनंतर पोलीस महाजनांच्या घरी गेलेले आहेत. पोलिसांनी प्रकाश महाजनांची विचारपूस केली आहे. मला नारायण राणे यांना आव्हान द्यायचं आहे, (Maharashtra politics) असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. मला अटक केली तरी मी मागे हटणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.

धमकीनंतर महाजनांच्या घरी पोलिसांकडून चौकशी केली गेली. महाजनांना आलेल्या (Prakash Mahajan Challenge To Narayan Rane) धमकीच्या मेसेजनंतर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला दाखल; कॅलिफोर्निया सरकारनं नेमकं काय केलं?

विरोधकांना भीत नाही…

या किंवा येऊ कणकवलीत, असं म्हणत महाजनांनी दंड थोपटले आहेत. तयारी आहे का तुमची? संघाच्या मुशीत तयार झालेला प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी यांच्यासारखा डुप्लिकेट संघसेवक नाही. मी दाजी खेडकर आणि संभाजी भिडे यांचा स्वयंसेवक आहे. वसंतराव भागवत यांचा जनसंघ पासूनचा मी कार्यकर्ता आहे. अटलबिहारी वाचपेयी आणि बाळासाहेब आमचे आराध्य दैवत आहेत. मी विरोधकांना भीत नसतो, असं देखील प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

‘मी विधवा होईन, मग आपण लग्न करू’, राजला वचन… राजाचा घात; सोनमची खुनी खेळाची स्क्रिप्ट एकदा वाचाच

प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशाराच दिला होता. पुन्हा आमच्याविरोधात बोलला, तर उलट्या करायला लावीन, अशी धमकी राणेंनी महाजनांना दिली होती. त्यानंतर राणे समर्थकांनी फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असा आरोप महाजांनी केला.

उद्या माझा अपघात झाल्यास याची सगळी जबाबदारी नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल. राणेंनी धमकी दिल्यानंतर आज प्रकाश महाजन आरोप करणार होते. त्याअगोदरच त्यांच्या घरी पोलीस गेले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube