भुजबळांना सत्तेचा मोह; राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलतात; ठाकरेंच्या नेत्याने पेटवली वात

  • Written By: Published:
भुजबळांना सत्तेचा मोह; राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलतात; ठाकरेंच्या नेत्याने पेटवली वात

छ. संभाजीनगर : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलत राहिले असे म्हणत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) बाहेर पडले मात्र त्यांनी पक्ष फोडला नाही. बाळासाहेबांना सांगून ते बाहेर पडले असे महाजन म्हणाले. एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भुजबळांवर वरील विधान केले आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केल्याचं विधान भुजबळांनी केले होते. त्यावर आता प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

(MNS Leader Prakash Mahajan On Chhagan Bhujbal)

भुजबळांच्या आनंदावर संशोधन करा अन् त्यांना काय हवयं ते एकदाचं देऊन टाका; शिरसाटांनी कान टोचले

भुजबळ स्वतःचा इतिहास विसरत आहेत शरद पवारांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे भुजबळ असून, भुजबळांना सत्तेचा मोह खूप आहे सत्ता मिळत नाही म्हणून त्या गोष्टीची मळमळ बाहेर येत असल्याचे महाजन म्हणाले. लोकसभेला नाशिक लढवणार म्हणून चर्चा होती पण ते काही झालं नाही. त्यानंतर त्यांना राज्यसभेवरती घेणार होते, तेही झालं नाही. ज्यावेळेस भुजबळांना एखादी गोष्ट मिळत नाही, त्या गोष्टीला तात्विक मुलामा देण्याचं काम करतात.

मला खासदार व्हायचंय हे नक्की पण, माझ्यावर अन्याय झाला का? हे अजितदादाच सांगतील

भुजबळ रागाच्या भरात बाहेर पडले

यावेळी महाजन यांनी 1993 साली घडलेली गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, भुजबळ 93 साली 18 आमदार घेऊन बाहेर पडले मंडल आयोगामुळे पडले असे सांगितले जाते पण हे सर्व खोटं आहे. खरं कारण म्हणजे मनोहर जोशींना विरोधी पक्षनेता केलं म्हणून त्या रागापोटी भुजबळ त्यावेळी बाहेर पडले होते. प्रत्येकाला वैयक्तिक प्रगती करण्याचा अधिकार आहे.

मोठी बातमी : विधानसभेसाठी ‘राज’ खेळी, मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे देणार मोठा धक्का

राज ठाकरे कशामुळे बाहेर पडले ते भुजबळांना काय माहिती? असा प्रश्नही महाजन यांनी उपस्थित केला.  रक्ताचं नातं तुटत असतं का ? ही वैचारिक भिन्नता आहे. विचार पटले नाही,  त्यांना वाटलं इथे प्रगती होऊ शकतं नाही म्हणून राज ठाकरे बाहेर पडले असतील. पण ते जरी बाहेर पडले तरी, त्यांनी पक्ष फोडला नाही. बाळासाहेबांना सांगून ते बाहेर पडले असे महाजन म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज