भिक्षेकरी समाज बांधवांना मिळणार कष्टाची भाकरी; महसूल मंत्री विखेंचे गौरवोद्गार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 25T121838.853

वसुधा पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.मुंबईतील विधिमंडळ दालनात आयोजित ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राज्यशासनाच्या महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुर्नवसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजपयोगी उपक्रमांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

Rohit Pawar : मुंबईला कितीही मागे खेचा शेवटी मुंबई ही मुंबईच आहे; बँक रँकिंकवरून रोहित पवारांचे चिमटे

देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सबका साथ सबका विकास यामाध्यमातून सर्वांगीण विकासाच्या दिशेने आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. भिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने जगता यावे, कष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, असे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याबाबत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महिला व बाल विकास विभागातील सर्वांचे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी अभिनंदन केले.

Post Account Scam : पुण्यात पोस्ट खात्यात कोट्यावधीचा घोटाळा; तीन पोस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

वसुधा प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकरी पुर्नवसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गोशाळा व इतर समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून याचा पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे सुरू होतो आहे. यामुळे भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, यापुढेही असे प्रकल्प राज्यभर सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला गती मिळेल असा विश्वास महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त आर विमला, अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिक डॉ. इंदू जाखड, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी मान्यवर आणि श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Tags

follow us