Raj Thackeray : रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांना मारहाण…राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता
कल्याण रेल्वेस्थानकावर परप्रांतीयांना मारहाण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीयं.
Raj Thackeray : कल्याण रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांना मारहाण प्रकरणी आज ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी पार पडली. कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीयं. २००८ मध्ये झालेल्या घटनेचा निकाल १८ वर्षांनी सुनावण्यात आला. या निकालामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळालायं.
पुणे कॉंग्रेसला नवे कारभारी मिळाले! प्रशांत जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड…
न्यायालयाचा निकाल काय?
२००८ मध्ये झालेल्या घटनेचा निकाल १८ वर्षांनी सुनावण्यात आला. राज ठाकरे यांची ठाणे कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टात सादर करण्यात आला पुरावा हा पुरेसा नव्हता. त्याशिवाय, काही पुरावे नियमाच्या अनुषंगाने नव्हते. आरोपी क्रमांक १ ते ७ यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप होता. मात्र, कोर्टासमोर सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा सादर करता आला नाही. आरोपी घटनास्थळी प्रत्यक्षात हजर होते, याचा पुरावा सरकारी पक्षाला सादर करता आला नसल्याचे कोर्टाने म्हटले असल्याचे राज ठाकरे यांच्या वकिलांनी म्हटले.
हे प्रकरण २००८ सालातील आहे, जेव्हा ऑल-इंडिया रेल्वे भरती परीक्षेसाठी महाराष्ट्रात, विशेषतः कल्याण परिसरात मोठ्या संख्येने परप्रांतीय उमेदवार आले होते. या खटल्यात राज ठाकरे हे ‘आरोपी क्रमांक १०’ आहेत. राज ठाकरे यांनी ‘मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या’ असा आरोप करत भडकाऊ भाषण केल्याचा ठपका फिर्यादी पक्षाने ठेवला आहे. त्यांच्या याच चिथावणीखोर भाषणामुळे प्रवृत्त होऊन मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान केले, असा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल होता, तर दोन आरोपींचा खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला आहे.