जेन-झीने सरकारच्या झिंज्या उपटल्या, राज ठाकरेंचा निशाणा, मुंबईत उद्या अभिनंदन मोर्चा होणार
Uddhav Thackeray-एका वाक्यत सांगायचे, तर जेन झीने (GEN Z) ने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला जमिनीवर आणले आहे.
Uddhav Thackeray and Raj Thackeray : कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनापुढे सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी मुंबईत तिरंगा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. आता तिरंगी मोर्चा नाहीतर अभिनंदन मोर्चा उद्या रविवारी काढला जाणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
ठाकरे बंधूंची मातोश्रीवर संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात दोघांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्या शिवाजी पार्क मैदानावरती मोर्चा होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे हा तरुणांचा विजय आहे. एका वाक्यत सांगायचे, तर जेन झीने (GEN Z) ने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला जमिनीवर आणले आहे. यात अभिजित दिपके यांच्यासह तरुणांचा वाटा आहे. मस्तवाल सरकारला माघार घ्यावे लागले आहे. त्याचा जल्लोष होण्याची गरज आहे. शिवाजी पार्कवर जल्लोष होणार आहे. राग प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेला आहे. पुढे अभिजित दीपके हा जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षणमंत्री असताना कितीवेळा नीट पेपर फुटला आहे. 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या झालेली आहे. तेव्हाच राजीनामा दिला असता तर हे प्रकरण ताणलेच गेले नसते. आम्हाला कोण काय करते, हे सगळ्या तरुणांनी दाखवून दिले आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
शिंदे गेले की फडणवीस दिल्लीला जातातच..
प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत. त्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, आजपर्यंत फडणवीस हे कितीवेळेस दिल्लीला गेले आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये दिल्लीला जाण्यासाठी चुरस आहे. शिंदे गेले की फडणवीस जातात. फडणवीस गेले की शिंदे जातात. हे खुपदा झालेले आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लावला आहे.