विवाहनंतर काही दिवसांतच पतीच निधन; सरपंच ते केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास

विवाहनंतर काही दिवसांतच पतीच निधन; सरपंच ते केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास

 Raksha Khadse Union Ministership : नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवन परिसरात हा सोहळा पार पडला. यावेळी मोदी यांचं भाजप बहुमताचं सराकर नसून ते एनडीए बहुमताचं सरकार आहे. (Modi Cabinate) त्यामध्ये सहयोगी पक्षांच्यासोबत स्थापन झालेलं हे सरकार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्य क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर, नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पाचव्या नंबरवर मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, सर्वात जास्त चर्चा सुरू झाली ती रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची. (Raksha Khadse) कारण सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून जात त्यांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्रातून एकमेव महिला खासदार मंत्री झाल्या आहेत.

पती निखिल खडसे यांची आत्महत्या PM Modi मैं नरेंद्र दामोदरदास मोदी. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदी पंतप्रधानपदी विराजमान

रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झालं होतं. मात्र, पुढे त्यांच्यावर दु:खाची बाजू आली. पती निखिल खडसे यांनी आत्महत्या केली. परंतु, त्या संकटातूनही रक्षा बाहेर पडल्या. पुढे त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुन्हा त्यांनी काही मागे वळून पाहिलं नाही. त्या आता तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. अखेर मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात म्हणजे एनडीए सरकारमध्ये रक्षा खडसेंना केंद्रीय मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. दरम्यान, रक्षा खडसेंना कुठली जबाबदारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

रक्षा खडसेंची राजकीय वाटचाल

सरपंच कोथळी, तालुका. मुक्ताईनगर, जिल्हा- जळगाव, महाराष्ट्र.
जिल्हा परिषद – जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष ( सभापती) आरोग्य विभाग, शिक्षण आणि क्रीडा समिती जिल्हा परिषद, जळगाव,
⁠2014 ते 2019 पर्यंत पहिल्यांदा खासदार
2019 te 2014 पर्यंत दुसर्‍यांदा खासदार
2024 साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.
09 जून 2024 रोजी रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

जनतेच्या आशीर्वादामुळेच हे शक्य – एकनाथ खडसे

रक्षा खडसेंना मंत्रिपदाची संधी मिळाल्याबाबत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले, रक्षाताईंना मंत्रीपद मिळत आहे. याचा आमच्या परिवाराला अतिशय आनंद आहे. सलग तीन वेळा रक्षाताई रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यात त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची तिसरी टर्मही चांगली राहील. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे रक्षाताई आज उच्चपदापर्यंत जाऊ शकल्या. आमच्या परिवारातील एक सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात जात आहे, याचा आम्हाला आनंद आहे. रक्षाताईंनी अनेक वर्ष केलेल्या श्रमाचे हे फळ आहे. त्याचबरोबर जनतेचे त्यांच्या पाठीशी असलेले आशीर्वाद यामुळे हे शक्य झाले आहे. देशाबरोबर आपल्या भागासाठी रक्षाताई नक्की योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube