रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला ठाकरेंच्या वाघीणीचाच ‘खो’; नाव न घेण्याचे कारणही दिले

  • Written By: Published:
रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला ठाकरेंच्या वाघीणीचाच ‘खो’; नाव न घेण्याचे कारणही दिले

मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंचे (Supria Sule) नाव आघाडीवर होते. मात्र, आता या स्पर्धेत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पत्नी रश्मी ठाकरेंचेही नाव चर्चेत आले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेल्या विधानानंतर रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत आले आहे. (Kishori Pednekar On Rashmi Thackeray Name For Maharashtra CM Post)

उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम..; शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

काय म्हणाल्या होत्या वर्षा गायकवाड?

दिल्लीला आतिशी यांच्या रुपाने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री लाभल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? असा प्रश्न काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना ‘सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात”, असा दावा गायकवाड यांनी केला. त्यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.

Video : राहुल गांधींची जीभ छाटू नका तर, चटके द्या; सेनेनंतर आता भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी पुरोगामी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री लाभली तर, मला खूप आनंद होईल असे म्हणत मविआतील कोणत्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाल्या तरी मला आनंदच होईल असे गायकवाड म्हणाल्या होत्या. यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतून रश्मी ठाकरे तर, राष्ट्रवादी पवार गटातून सुप्रिया सुळे दावेदार असल्याचा दावादेखील वर्षा गायकवाड यांनी केला.

Maa Amruta : अमृता फडणवीसांना मॅडम नाही तर, माँ अमृता संबोधणार, भाजप नेत्याचं विधान चर्चेत

उगाच रश्मी ठाकरेंचे नाव घेऊ नका

एकीकडे वर्षा गायकवाड यांच्या दाव्यानंतर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच दुसरीकडे ठाकरे गटातील महिला नेत्यानं या पदासाठी उगाच रश्मी ठाकरेंचे नाव घेऊ नका असे म्हटले आहे. रश्मी ठाकरेंनी कधीच राजकारणात कधीही रस दाखवला नाही त्यामुळे त्यांच्या नावाची राजकीय चर्चा करू नये. त्या उद्धव ठाकरेंसोबत असतात याचा अर्थ राजकारणात आहेत असं होत नाही. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत, मात्र, त्यात रश्मी ठाकरे यांचं नाव असता कामा नये असे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube