रविंद्र चव्हाण आता भाजपचे नवे कॅप्टन! म्हणाले, पक्षाचे माझ्यावर मोठे उपकार आहेत, त्यामुळं…

Ravindra Chavan : गेली काही दिवसांपासून भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड होई अशी जी चर्चा होती तीला आज पुर्णविराम मिळाला. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची आज निवड झाली आहे. (Chavan) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे आधी कार्याध्यक्ष होते, आता ते राज्यात भाजपचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले, कधीच रवी दादा आगे नाही, ना रविंद्र चव्हाण आगे बढो नाही, तर भाजप आगे बढो असं पाहिजे. माझी आज या पदावर निवड झाली, भाजपने माझ्यावर उपकार केलेत असं माझं मत आहे. माझ्याबरोबर काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना त्याची जाण आहे अशी बावना त्यांनी वक्त केली.
आता काही लोक म्हणतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार.. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर थेट वार
त्याचबरोबर माझी ओळख भारतीय जनता पार्टी आहे. एवढ्या मोठ्या पक्षाच्या मोठ्या पदावर माझी नेमणूक झाली आहे. 2002 पासून पक्षाचं काम करायला सुरुवात केली. सामान्य कुटुंबातून आलेला माणूस पक्षाचा प्रमुख होतो, भाजपची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आणि प्रभावी अशी आहे. महाराष्ट्रातील लोकांपर्यंत ती पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे असंही ते म्हणाले.
2014 च्या आधीचा काळ आठवा आणि मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार पहा, ही माणसं दिवस रात्र पाहात नाही. सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. आपलाच कार्यकर्ता हे करु शकतो. भाजपशिवाय कोणत्याही पक्षात ही विचारधारा नाही. राष्ट्रीयत्वाचा धागा मला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. बावनकुळेंनी जे सांगितलं हे आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. तुमच्या माझ्या परिश्रमाचीच ही वेळ आहे असंही ते यावेळी म्हणाले.