मोठी बातमी! शालेय विद्यार्थ्यांची 26 जानेवारीची सुट्टी रद्द, राज्य सरकारचा निर्णय
Republic Day holiday For School Students cancelled : देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) काही दिवसांवर येवून ठेपलाय. संपूर्ण देशासह राज्यात देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजिनिक सु्ट्टी आतापर्यंत देण्यात येत होती. परंतु आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शालेय विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी (26 January 2025) रद्द करण्यात आली आहे.
नवीन वर्षात राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर शालेय विभागाने 31 डिसेंबर रोजी एक परिपत्रक देखील जारी केलंय. या परिपत्रकात सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना काही महत्वाचे निर्देश देण्यात आले (Republic Day holiday) आहेत. शाळेमध्ये दिवसभर थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करावं, असं सांगण्यात आलंय. यामागे कारण देखील तितकंच विशेष आहे.
राहा तयार! लवकरच येतोय ‘एप्रिल मे ९९’, रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण
राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. कारण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये 26 जानेवारीच्या दिवशी राष्ट्राचा इतिहास, देशाचे भविष्य आणि आपली महान संस्कृती याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश (School Student News) आहे. त्यामुळे आता सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलंय.
शालेय विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात कोणते कार्यक्रम घ्यावेत, यासंदर्भात आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी जाहीर केलीय. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवर असावेत, असंह देखील परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांनी या निर्देशाची ठोस अंमलबजावणी करावी, असे देखील आदेश दिलेत.
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सामान्य भाविकाला मिळणार साईबाबांची आरती करण्याचा मान
आता 26 जानेवारीला सकाळी झंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही. तर शाळेत विविध कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल, असा शालेय विभागाचा आणि राज्य शासनाचा उद्देश आहे.