नगर- घोडेगाव रस्त्यावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त

नगर- घोडेगाव रस्त्यावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar Local Crime Branch : नगर- घोडेगाव रस्त्यावर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Ahilyanagar Local Crime Branch) अटक केली आहे. महेश आबासाहेब शिरसाट (वय 26 रा.म्हसले ता नेवासा अहिल्यानगर), गौरव शहादेव शिरसाट (वय 25), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून सहा लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

नगर- छत्रपती संभाजी नगर महामार्गावर धर्मनाथ टिकाराम जोहरे हे नेवासा फाटा छ. संभाजीनगर येथे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होते. त्याचवेळी त्याठिकाणी एक स्विफ्ट कार अली व त्यामधील चालकाने जोहरे यांना संभाजीनगर येथे सोडतो असे म्हटले. त्यानंतर जोहरे हे कारमध्ये बसले व त्यांनतर कार काही अंतरावर गेल्यानंतर जोहरे यांना चाकुचा धाक दाखवून व मारहाण करुन त्यांच्या कडील रोख रक्कम्, लॅपटॉप, मोबाईल फोन, घड्याळ काढून घेवून त्यांना निर्जन स्थळी उतरवून दिले.या बाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल फिर्यादीनंतर याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने पाऊले उचलली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड यांच्या पथकाने घटनाठिकाणचे तसेच परिसरातील आजुबाजुचे रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज हे तपासले. त्यानांतर आरोपीबाबत माहिती जमा केली.

शिंगणापूर प्रकरण! शेटे आत्महत्या…, मंदिर विश्वस्तांची होणार चौकशी

सदर गुन्हा हा महेश शिरसाठ यांनी आणि त्याच्या एका साथीदाराने केला असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी सापळा रचून महेश आबासाहेब शिरसाठ वय 26 वर्षे, रा. म्हसले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर,  गौरव शहादेव शिरसाठ वय 25 वर्षे,  यांना पकडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली . त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम, गुन्ह्याचे वेळी वापरलेली कार, मोबाईल, चाकु असा एकुण सहा लाख पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube