सूर्याच्या हातात कॅच बसला नसला तर मी त्याला बसवला असता; रोहितच्या भाषणावर सभागृहात पिकला हशा

सूर्याच्या हातात कॅच बसला नसला तर मी त्याला बसवला असता; रोहितच्या भाषणावर सभागृहात पिकला हशा

Rohit Sharma on Surykumar Yadav in Vidhanbhavan : विधानभवनात झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मराठीत भाषण केले. यावेळी त्याने T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवने (Surykumar Yadav) घेतलेल्या कॅचवर त्याचं कौतुक केलं. तसेच तो म्हटला जर सूर्याच्या हातात तो कॅच बसला नसता. तर मी त्याला बसवलं असतं. रोहितच्या या प्रतिक्रियावर सभागृहात हशा पिकला होता.

Shweta Tripathi: श्वेताचा विकी कौशलसोबत रोमान्स; चित्रपट फ्लॉप ठरला मात्र…

टी 20 विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाच्या (Team India) मुंबईतील चार खेळाडूंचा (Cricket ) आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. विधानभवनामध्ये अशा प्रकारे खेळाडूंचा कौतुक सोहळा पार पडला. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा बोलत होता.

सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की, असा कार्यक्रम विधानभवनात आत्तापर्यंत झाला नाही. मात्र असा कार्यक्रम आमच्यासाठी झाला. याचा अत्यंत आनंद होत आहे. मुंबईत काल आमच्यासाठी झालेला जल्लोष हे आमचं स्वप्न होतं. भारतात विश्वचषक आणायचा ज्याची आम्ही अकरा वर्षांपासून वाट बघत होतो. हे सर्व यश माझ्यामुळे किंवा सूर्यामुळे नाही. तर संपूर्ण टीममुळे मिळालं आहे.

EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींना दिलासा, मिळणार मोफत शिक्षण, सरकारचा निर्णय

मला सर्वोत्कृष्ट टीम मिळाली होती. प्रत्येकाने वेगवेगळी भूमिका बजावत वेगवेगळ्या सामन्यांमध्ये आपल्याला जिंकवून दिलं. आत्ताच सूर्य कुमार म्हणाला की, माझ्या हातात कॅच बसला. बरं झालं त्याच्या हातात तो कॅच बसला नाही तर मी त्याला बसवलं असतं. असं म्हणत रोहितने T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचवर त्याचं कौतुक केलं आणि षट्कार लगावणारी प्रतिक्रिया दिली. रोहितच्या या प्रतिक्रियावर सभागृहात हशा पिकला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज