अजित पवारांच्या नोटीसनंतरही जगतापांच्या सभा! संगमनेरमधील मोर्चामध्ये भगवी टोपी टाळत मवाळ भूमिका

Sangram Jagtap यांना पक्षाकडून नोटीस बजावली गेली आहे. त्यानंतरच्या सभेमध्ये जगतापांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

Sangram Jagtap

Sangram Jagtap’s meeting despite Ajit Pawar’s notice Soft stance, avoiding saffron caps, in Sangamner rally : दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी संग्राम जगताप यांना नोटीस बजावली आहे. मात्र तरी देखील जगतापांच्या सभांचा धडाका सुरूच आहे. अहिल्यानगरमधील सभेनंतर संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘स्मार्ट सुनबाई’चा टिझर लाँच, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोटीस काढल्यानंतर आज आमदार संग्राम जगताप यांनी मोर्चात सहभाग घेतला. मात्र यावेळी सतत डोक्यावर असणारी भगवी टोपी मात्र त्यांनी घातली नव्हती हे विशेष. संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ देखील या मोर्चात आज सहभागी झाले होते. यावेळी जगताप यांचे भाषण काहीसे मवाळ झाल्याचे दिसून आले. तर खताळ यांनी मात्र आक्रमक भाषण करत पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केलीय…दरम्यान सभेनंतर माध्यमांशी मात्र बोलण्यास नकार देत जगताप सभास्थाळहून नगरकडे रवाना झाले…

काय म्हणाले आमदार संग्राम जगताप?

अत्याचाराच्या शंभर केसेसमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात. आपल्यातीलच काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे. या लोकांना वेळोवेळी माफ करण्याचे पाप आमच्यासकट अनेकांनी केले मात्र आता प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे. असे देखील आमदार जगताप यांनी म्हटलं.

काय म्हणाले शिवसेनेचे आमदार अमोल खताळ?

दोन आरोपी पैकी एक आरोपी सापडत नाही यातून शंकेला वाव. तुमच्यावर कोणाचा राजकीय दबाव असेल तर आम्हाला सांगा आणि कोणाला खुमखुमी असेल तर ती खुमखुमी काढायला आम्ही समर्थ आणि देवभाऊ देखील पक्का. पुढच्या पंधरा दिवसात कारवाई करा..
अनधिकृत मदरसे, मशिदी यांच्यावर कारवाई करा. बाहेरून आलेल्या व्यक्तीचे ओळखपत्र तपासा. हिंदुस्थानी मुसलमान सोबत आम्ही राहू. शांत बसलेले काही हिरवे साप पुन्हा वळवळ करायला लागले. त्यांना ठेचायचे देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने कळत.

follow us