…तर फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या; संधी मिळताच राऊतांनी घेरलं
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदासपेठेत एकामागून एक दुचाकीसह चार ते पाच वाहनांना धडक दिली. यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून, या अपघातावरून संधी मिळताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) फडवीसांना घेरले आहे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chadrashekhar Bawankule) मुलाने सहा गाड्या उडवल्या. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut On Nagpur Hit And Run Case)
Rahul Gandhi : महाराष्ट्राने करून दाखवलं; परदेशात जाऊन राहुल गांधींनी केलं महाराष्ट्राचं कौतुक
कायदा फडणवीसांच्या कोठीवर नाचतोय
घडलेल्या अपघातावरून हल्लाबोल करताना राऊत म्हणाले की, ज तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे. तो नशेत धुंद होता. दोन लोक गंभीर जखमी झालेत आणि एफआयआरमध्ये मुलाचे नाव देखील नाही. सर्व पुरावे मिटवण्यात आले आहेत हे अधिकार तुम्हाला आहेत का? देवेंद्र फडणवीस तुम्ही या पदावर बसण्याच्या लायक नाही. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत तोपर्यंत कुठल्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. कायदा फडणवीसांच्या कोठीवर नाचत असल्याचेही राऊत म्हणाले.
अमित शाहंसोबत विमानतळावर काय खलबतं झाली; अजितदादांनी शब्द न शब्द सांगितला…
…तर फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, घडलेल्या घटनेत जर कोणी दुसऱ्या पक्षाचा नेता असता तर, फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या. मात्र आजोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत तोपर्यंत कुठल्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही. हिट अॅन्ड रन प्रकरण महाराष्ट्रात ऐवढी वाढत आहेत. मोठ्या नेत्यांची मुलं लोकांना नशेत गाडी चालवून मारत आहे आणि मोठ्या नेत्यांची मुलं असल्याने त्यांच्या नावाची FIR सुद्धा नाही. गाडी चालवणाऱ्या ड्राईव्हरची अदलाबदल केली नेम प्लेट कोणी बदलली? बावनकुळे यांचा आणि त्यांच्या परिवाराचा यांच्याशी संबंध नाहीये मग ही चोरी चपाटी का केली ?