मी प्रार्थना करत होतो अशी बातमी येऊ नये; अजित पवारांवर बोलताना संजय राऊत भावूक
अजित पवार यांच्या त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, या गोष्टी स्मरणात राहतील.
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची (Ajit Pawar) बातमी आली, त्यावेळी प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये. अजित पवार सही सलामत त्या अपघातातून बाहेर यावेत. पण ही धक्कादायक,बातमी कानावर आली. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राच राजकारण, समाजकरण हे बेचव आणि अळणी होईल. त्यांचं व्यक्तीमत्व दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणार नेता होता अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या निधनावर दिली आहे.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनवरची पकड या गोष्टी सैदव महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांच एक नातं होतं. त्याच बारामतीत त्यांचा मृत्यू यावा हा विचित्र योगायोग आहे” असं संजय राऊत म्हणाले. श्रद्धांजली त्यांना वहावी लागेल असी कधी मनात आलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीच राजकारण केलं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेटला येताना पूर्ण तयारी करुन येणारे ते मंत्री होते.
अजित पवारांसोबत विमानात कोण होतं?, विमान कोणत्यां कंपनीचं होत अन् काय घडलं?
राज्याच्या प्रश्नांचा अभ्यास, त्यांना विशेष पाटबंधारे, पाणी या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केलं. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं. गेल्या अडीचवर्षात शरद पवारांशिवाय राजकारण त्यांनी सुरु केलं. त्यांचा असा अकाली अंत होईल अस कोणाच्याही ध्यनीमनी नव्हतं” असं संजय राऊत म्हणाले. अत्यंत कार्यक्षम मंत्री असा त्यांचा लौकीक होता. त्यांनी त्यांना मिळालेले प्रत्येक पद राजकारणासाठी, कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी विकासासाठी वापरलं.
अजित पवार त्यांच्या बोलण्यात कधी राग, चीड आली तरी पटकन विनोदी वाक्य टाकून सर्व वातावरण हसरं, खेळत ठेवायची त्यांची कसब होती. आज खरच महाराष्ट्राच दु:ख आहे. महाराष्ट्राचे काय ग्रह फिरलेत माहित नाही, अनेक प्रमुख नेते आपल्यापासून हिरावून गेलेत. विलासराव देशमुख,गोपीनाथराव मुंडे अगदी उमद्या वयात गेले आणि आता अजित पवार” असं संजय राऊत म्हणाले.
