…बोलायला लावू नका, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील.. मंत्री शिरसाटांचा राऊतांवर ‘थेट’ वार

…बोलायला लावू नका, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील.. मंत्री शिरसाटांचा राऊतांवर ‘थेट’ वार

Sanjay Shirsat on Sanjay Raut Book : संजय राऊतांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक येण्यापूर्वीच चर्चेत आलं आहे. या पुस्तकातील दावे अन् गौप्यस्फोटांनी राजकारणात खळबळ उडाली आहे. (Raut) या पुस्तकातील दाव्यांवर आता सत्ताधारी गोटातून तुफान हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजप, शिंदे गटातील अनेक नेते, मंत्र्यांनी राऊतांच्या दाव्यांवर चांगलेच तोंडसुख घेतलं आहे. मंत्री संजय शिरसाट यांचे पुस्तक हे केवळ प्रसिद्धा स्टंट असल्याची टीका केली आहे.

ही नौटंकी आहे. मी काही तरी स्फोटात्मक बोलतो आणि लिहिलो, ते सत्य माना, हे प्रकार प्रसिद्धीसाठी आहेत अशा शब्दांत शिरसाट यांनी टीका केली. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना, मग ते चित्रपट क्षेत्रातील कलाकार असो, व्यापारी, बिल्डर असो कोणी असो, राजकारणातील कोणी असेल त्याला मदत केली आणि वाच्यता केली नाही. म्हणून अनेक लोक शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करतात. यांच्यामुळे शिवसेनाप्रमुख मोठे झाले नाही असंही शिरसाट म्हणाले आहेत.

पवारांमुळे मोदी तुरूंगात जाता जाता वाचले; राऊतांच्या खळबळजनक दाव्यानं राजकारण पेटणार

शिवसेना वाढायला मुंबईत कारणीभूत कोण होतं, हे कधी कुणी सांगितलं नाही. शरद पवार कुणाशी बोलले. पवारांनी विरोध का केला? नरेंद्र मोदींनी कुणाला वाचवलं. या गोष्टी शरद पवार यांनी बोलल्या तर त्याला महत्त्व आहे. ज्यांनी मदत केली. ते बोलले तर त्याला आगळंवेगळं महत्त्व आहे ना. तुम्ही ही दलाली कशाला करता. तुम्हाला कुणी सांगितलं हे सर्व. तुम्ही त्यांचं ऐकून हे करत असाल तर त्यांच्या तोंडून येऊ द्या ना, असंही संजय शिरसाट म्हणाले.

लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि मतं पाहून खऱ्या अर्थाने जे शिवसैनिक आहेत त्यांच्या हातात शिवसेना आली आहे. तुम्ही सहानभूतीच्या आधारावर राजकारण केलं ते लोकांनी नाकारलं. बोलायला लावू नका, शिवसेनाप्रमुखांवर तुमचं किती बेगडी प्रेम होतं, त्या शेवटच्या दिवसाला आम्ही सुद्धा तिथे होतो. मी होतो. मातोश्रीच्या आत मी होतो. म्हणून आम्हाला बोलायला लावू नका. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील. आणि त्यावेळी जे शिवसैनिक अहोरात्र शिवसेनाप्रमुखांच्या पाठी ढाली सारखे उभे होते, म्हणून त्याच शिवसेनेच्या हातात शिवसेना आली आहे, असा घणाघातही शिरसाटांनी केला.

संजय राऊत काही करू शकतात. राहुल गांधी परदेशातील विद्यापीठात जातील आणि तिथे या पुस्तकाचं प्रकाशन करतील. यांना राहुल गांधी हे शिवसेना प्रमुखांपेक्षाही मोठे वाटतात. हे सत्य आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय राऊत खरं कधीच बोलणार नाही. एखाद्या दरोड्यासारखा आहे. पुढे कसा दरोडा टाकायचा ही दरोडेखोराची मानसिकता असते, तीच राऊतांची मानसिकता आहे असंही शिरसाट म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube