स्कॉर्पिओ कारवर असलेले फिंगरप्रिंट्स सुधीर सांगळेचे, संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी फॉरेन्सिक रिपोर्ट समोर

Santosh Deshmukh Murder Update Forensic Evidence : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी एक मोठं अपडेट समोर आलंय. या प्रकरणी तीन आरोपींनी कबुली दिलीय. त्यानंतर आता अजून एक मोठा खुलासा या प्रकरणात झालाय. आरोपी सुदर्शन घुलेने अपहरण आणि हत्येची कबुली दिल्यानंतर अजून एक खुलासा याप्रकरणी झालाय. अपहरणासाठी वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून तब्बल 19 पुरावे (Beed Crime) सापडलेत. फॉरेन्सिक अहवालामध्ये आरोपी सुधीर सांगळे याचे फिंगरप्रिंट आढळलेत.
विविध तपास यंत्रणांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास सुरु असून अनेक धक्कादायक माहिती समोर येतेय. संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी स्कॉर्पिओ गाडी वापरण्यात आली होती. या गाडीत अनेक पुरावे सापडले आहेत. या गाडीचा स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक अहवाल (Scarpio Car Fingerprints) समोर आलाय. स्कॉर्पिओ कारच्या काचांवर असलेले फिंगरप्रिंट्स फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आरोपी सुधीर सांगळेचे आहेत, असं तपासात उघड झालंय.
7 कोटी 79 लाख जमा… ज्यूस विक्रेत्याला आयकर विभागाची नोटीस, मग घडलं भयंकर
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक काळ्या रंगाची स्कार्पिओ कार वापरण्यात आली होती. या काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये तब्बल 19 पुरावे सापडलेत. वाहनावरील ठसे आणि इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहे, असं देखील पोलिसांनी सांगितलंय. या कारच्या डाव्या बाजूच्या दरवाज्याच्या काचेवर 2 ठसे आढळून आलेत. फिंगरप्रिंट ब्युरोने हे फिंगरप्रिंट सुधीर ज्ञानोबा सांगळे नावाच्या आरोपीचे आहेत, असा अहवाल दिलाय. तर आरोपी सुदर्शन घुले याची ही स्कॉर्पिओ गाडी आहे.
स्वारगेट प्रकरणातील पिडीतेची मागणी अन् असीम सरोदेंनी घेतली मोठी भूमिका
तर दुसरीकडे आरोपी सुदर्शन घुले याने पोलिसांसमोर जबाब नोंदवला. या जबावात घुलेने संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिलीय. संरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीत अडथळा ठरत होते. मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला मारहाण करत अपमानही केला होता. देशमुखांनी मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चॅलेंज दिलं होतं. याचाच राग आम्हाला आला. त्यामुळं अपहरण करत देशमुखांची हत्या केली, असं सुदर्शन घुलेने कबुल केलंय.