मोठी बातमी : अजित पवारांसोबत नेमके किती आमदार? अखेर उत्तर मिळालंं…

मोठी बातमी : अजित पवारांसोबत नेमके किती आमदार? अखेर उत्तर मिळालंं…

मुंबई : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. शरद पवार यांच्याबाजूनेही नेमके किती आमदार आहेत, याबाबतही खुलासा करण्यात येत नव्हता. आपल्यासोबत आवश्यक आणि गरजेएवढे आमदार असल्याचा दावा अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून सातत्याने करण्यात येत होता. मात्र अखेर या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. (Sharad Pawar faction has filed a disqualification petition against nine ministers and 31 MLAs including Ajit Pawar)

निवडणूक आयोगात आज (9 सप्टेंबर) राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने उत्तर दाखल केले. यात अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळण्यात आले. शिवाय मंत्र्यांसोबत अजित पवार यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहितीही आयोगाला देण्यात आली. यातूनच अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आहेत, याचे उत्तर मिळाले आहे.

मोठी बातमी: निवडणूक आयोगात शरद पवार गटाचे उत्तर दाखल, अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळले

अजित पवारांसह किती आमदार?

निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाने अजित पवारांसह नऊ मंत्री आणि 31 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यात पाच विधान परिषदेचे आमदार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याचाच अर्थ अजितदादांसोबत राष्ट्रवादीच्या विधानसभेतील 53 आमदारांपैकी 35 आमदार असल्याचे दिसून येत आहे. पण हे नेमके कोणते आमदार याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. तर विधान परिषदेच्या पाच आमदारांमध्ये आमदार रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, विक्रम काळे आणि सतीश चव्हाण यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

आईला पाहून जरांगेंना अश्रू अनावर… म्हणाले, ‘हत्तीचं बळं आलं, आता आरक्षणासाठी एकही मुडदा पडू देणार नाही’

राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा केला होता. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड चुकीचं असल्याच सांगत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. परंतु अजित पवार गटाचे दावा शरद पवार गटाने फेटाळला आहे. परंतु निवडणूक आयोगाने अद्याप पक्ष फुटीची नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तरे ऐकल्यानंतरच निवडणूक आयोग पुढील निर्देश देणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाला देखील आजच उत्तर दाखल करायचे आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube