10 तारखेनंतर राज्यात राजकीय भूकंप? एकत्र बसण्याचे प्रफुल पटेलांना शरद पवारांच्या सूचना

Praful Patel Meet Sharad Pawar : देशाचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या उपचारासाठी मुंबईतील

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Praful Patel Meet Sharad Pawar

Praful Patel Meet Sharad Pawar : देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुरुवातीला त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु होता मात्र आता त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी काल (05 नोव्हेंबर)  शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या सोशल मीडियावर या भेटीदरम्यान शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपण 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करु असं या व्हिडिओमध्ये शरद पवार प्रफुल पटेल यांना सांगत आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये 10 तारखेनंतर काय चर्चा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेत पक्षाचे खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अनेक घडामोडी घडत असून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

मी पवार साहेबांना भेटत असतो, आमचे पारिवारिक संबंध – प्रफुल पटेल

शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, मी शरद पवार यांच्या तब्येतेची माहिती घेण्यासाठी आलो होतो. त्यांची तब्येत अतिशय चांगली आहे. त्यांना थकवा होता म्हणून रुबीला गेले होते आणि पूर्ण चेकअपसाठी ते ब्रीच कँडीमध्ये आले आहेत. साहेब हसत होते, राजकीय काय सुरु आहे हे विचारत होते. सध्या त्यांची तब्येत अतिशय उत्तम आहे. आमची राजकीय भूमिका काहीही असेल पण व्यक्तिगत प्रेम आहे.

राजकीय भूमिका दुरावली होती, मी पवार साहेबांना भेटत असतो. आमचे पारिवारिक संबंध आहेत. हॉस्पिटलमध्ये बाकीच्या चर्चा करणे योग्य नाही,फक्त राजकारणात काय सुरु आहे हे शरद पवार यांनी विचारलं फक्त जनरल विचारले. देशात राज्यात काय चालले हे त्यांनी विचारले, अमेरिकेचे पण विचारलं असं माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले.

तब्येतीची काळजी घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू – पंतप्रधान मोदी

तर दुसरीकडे पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेत असताना शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोन करत तब्यतेची विचारणा केली होती. यावेळी सुप्रिया आता तयार आहे. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या असं शरद पवारांना पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

follow us