Video : पवारांचं खरमरीत प्रत्युत्तर! मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं?, त्यांची पार्श्वभूमी तर अतिशय चिंताजनक
जळगाव : या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी पवारांवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले की, मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं आहे? मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक असून, मीदेखील त्यांच्या कुटुंबावर बोलू शकतो, पण मी मोदींच्या पातळीला जाणार नाही. ते जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिंदेंची सगळी शक्ती ठाकरेंना रोखण्यातच जाणार; लोकसभेसाठी महाराष्ट्रात कोण कुणाच्या विरोधात…
उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेल असे विधान प्रतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केले होते. त्यांच्या या विधानावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदीसाहेब रिझल्ट देतात की माहिती नाही. पण त्यावर चर्चा, भाष्य आणि टीकाटिप्पणी करण्यात वेळ जातो. ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शांतपणे आणि गाजावाजा न करता काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे असे पवार यावेळी म्हणाले.
(Sharad Pawar On PM Modi Statement Over Uddhav Thackeray)
‘CM पदाची संधी नाकारली, त्याचवेळी बंड करायला हवं होतं’; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
ठाकरेंसाठी प्रार्थना..
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण त्यांची विचारपूस केली. मोदी या सगळ्याबद्दल लाख बोलतील असे पवार म्हणाले. पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये असे म्हणत पवारांनी थेट पत्रकार परिषदेतच ठाकरेंसाठी साकडं घातलं आहे. मोदींबद्दल लोकांमध्ये असणारी आस्था कमी होताना दिसत आहे. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण त्या कृतीत आल्या नाहीत. त्यांचा स्वभाव बेछुटपणे बोलण्याचा आहे. मग ती गोष्ट झेपेल की नाही, सरकारची आर्थिक स्थिती काय आहे? याबद्दल यत्किचिंतही विचार न करता ते अनेक गोष्टी कबूल करतात. मोदींनी 2014 मध्ये जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या.