Sharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात; एकाला अटक

Sharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात; एकाला अटक

राष्ट्रवादीचे शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात असल्याचं पोलिस तपासात पुढे आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एकाला पुण्यातून अटक केलीय.सागर बर्वे अस या युवकाचं नाव असून त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. आरोपी सागर बर्वेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Sharad Pawar threat case threads in Pune; One arrested)

PM Modi US Visit : अमेरिकन व्यावसायिकांमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेज; दौऱ्याआधीच सुरु केली ‘मोदी थाळी’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. शरद पवारांना आलेल्या धमकीबद्दल सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली होती. एका ट्विटर अकाऊंटवरून शरद पवारांना तुमचाही दाभोलकर होणार, असे म्हणत धमकी देण्यात आली होती.

BJP च्या अहवालातील आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाकारले; डॉ. सावंत म्हणाले, माझ्यावरचे आरोप खोटे

त्यानंतर पोलिसांकडून सौरभ पिंपळकर याने ट्विटरद्वारे ही धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. सौरभ पिंपळकरच्या ट्विटर बायोमध्ये भाजप कार्यकर्ता असा उल्लेख असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आणखी आता सागर बर्वेला पोलिसांनी अटक केलीय.

IOC Session:ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार का? मुंबईत होणाऱ्या IOC च्या अधिवेशनात होणार निर्णय

शरद पवारांना आलेल्या धमकीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. धमकी आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन धमकी देणाऱ्या ट्विटर हॅंडलवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांकडून दखल घेण्यात आली होती.

अखेर पोलिसांना या धमकी प्रकरणात एकाला अटक करण्यात यश आलं आहे. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी सागर बर्वे हा इंजिनिअर असून त्याने असं हे ट्विट केलंय का? तसेच हे पाऊल कोणत्या कारणाने उचललं याचा पोलिस तपास घेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube