Video : EVM प्रकरणी संघर्ष सुरुच; शरद पवार आज जाणार मारकवाडीत, काय घेणार भूमिका?
Sharad Pawar visit to Markadwadi : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्या आंदोलनाच प्रमुख केंद्र झालं ते मारकडवाडी हे गाव. (Sharad Pawar) ते आता देशात चर्चिलं जाऊ लागलं असून तेथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेले आहेत.
मोठ्या राज्यात भाजप, छोट्या राज्यात इतर ; निवडणुकीची आकडेवारी सांगत शरद पवारांची टीका
बॅलेट वर मतदान करण्यात यावं यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा निर्णय करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने 2 डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत या गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करत बॅलेटवर मतदानास विरोध केल्याने अखेर 3 डिसेंबर रोजी होणारे मतदान ऐनवेळी रद्द करावं लागलं होतं. आता सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या गावात येऊन ग्रामस्थांची भूमिका जाणून घेणार आहेत.
दोन गट
मारकडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या गटाने यावर आक्षेप घेतला होता. याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट वरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड दोन गट पडलेले आहेत .हे आंदोलन शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी सुरू केले असून याला संपूर्ण मारकडवाडीचा पाठिंबा नाही.
राज्य निवडणूक आयोगाने ही याबाबत खुलासा करीत मारकडवाडी येथील तीनही बुधवर झालेले मतदान आणि मतमोजणी समोर आलेले मतदान हे सारखेच असून यात विनाकारण मशीन बाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले होते. याशिवाय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जानकर गटाचे प्रतिनिधी पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित असूनही त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार अथवा अक्षय निकाल लागेपर्यंत घेतलेला नव्हता .