मद्य कंपनीनं दत्तक घेतली शाळा अन् ठेवला गौतमीचा कार्यक्रम; शरद पवारांच्या दाव्यानं खळबळ
Sharad Pawar : राज्यसरकारच्या दत्तक शाळांच्या मुद्द्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) एक खळबळजनक दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकार राज्यातील शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक पद्धतीने देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारवर विविध स्तरावरून टीके झोड उठली होती. त्यात आता शरद पवारांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवारांच्या दाव्यानं खळबळ…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महिला आत्याचारांच्या घटनांकडे लक्ष वेधले. तसेच त्यांनी यावेळी राज्यसरकारच्या दत्तक शांळांच्या मुद्द्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) एक खळबळजनक दावा केला आहे.
ललित पाटीलला महिला पुरवल्या जायच्या, माझ्याकडे त्याचा व्हिडिओ…; रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार म्हणाले की, ज्या जिल्हा परिषदांच्या, नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत. त्या आता खाजगी कंपनीला दत्तक देत चालवायला दिल्या जात आहेत. तसेच त्यांनी या शाळा सीएसआर फंडातून चालवाव्यात, त्यातून शाळांचा विकास करावा. त्या असं देखील सांगण्यात आलं आहे. मात्र या कंपन्यांना शाळांना कोणतही नाव देण्याचा अधिकार नाही. मात्र ते वैयक्तिक कामांसाठी शाळेचा, शाळेची संपत्ती तसेच साहित्य वापरू शकतील.
‘उद्धव ठाकरेंनी शिंदेंना Z+ सुरक्षा नाकारली म्हणजे..,’; संजय गायकवाडांचा थेट मुळावरच घाव
याचं एक उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यात एक शाळा मद्यपान करणाऱ्या कंपनीने दत्तक घेऊन शाळेत गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे शासकीय शाळा खाजगी कंपनींना दत्तक द्यायच्या या निर्णयाला देखील आपण विरोध केला पाहिजे. या सर्व निर्णयांवर आम्ही स्वस्थ न बसता सरकारला या बाबत योग्य तो निर्णय घ्यायला भाग पाडू हे चित्र या राज्यात तयार करायचे आहे. असा दावा करत शरद पवारांनी शाळा खाजगी कंपन्यांना देण्याच्या निर्णयावरून टीका केली.