शरद पवार स्वतः विरोधकांची मजबूत फळी उभारण्यासाठी प्रयत्नशील; विलीनीकरणाच्या अफवांवर शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

देशातील विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

  • Written By: Published:
Untitled Design 84

Shinde clarifies merger rumors : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या राजकीय चर्चांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून पक्ष स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आणि आगामी काळात अधिक जोमाने जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, नुकताच पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला असून त्या निमित्ताने आगामी राजकीय लढाया, संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या विस्ताराबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत पक्षाच्या विलीनीकरणाच्या अफवा पसरवल्या जाणे हे आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष स्वतःची स्वतंत्र विचारधारा, भूमिका आणि राजकीय दिशा घेऊन काम करत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्ष संघटन मजबूत करण्यावर आणि जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, देशातील विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

स्पेसएक्सने रचला आर्थिक इतिहास; जगातील सर्वात मोठ्या IPOमुळे मस्कच्या संपत्तीत 275 अब्ज डॉलरची भर

भाजपविरोधात सक्षम पर्याय उभा करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः पुढाकार घेत असून विविध पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले. दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. या बैठकीत आगामी राजकीय रणनीती, संसदेत आणि रस्त्यावर भाजप सरकारविरोधात लढण्याची भूमिका तसेच विरोधकांमधील समन्वय वाढवण्याबाबत चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

विलीनीकरणाच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असले, तरी पक्षाची भूमिका स्पष्ट असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवूनच ‘इंडिया’ आघाडीचा घटक म्हणून पुढे वाटचाल करणार असल्याचा पुनरुच्चार शशिकांत शिंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना तात्पुरता तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

follow us